Advertisement

मुंबईत पुढील दोन दिवस उकाडा कायम राहणार


मुंबईत पुढील दोन दिवस उकाडा कायम राहणार
SHARES

राज्यभर सूर्य आग ओकत असताना कधी ढगाळ वातावरण, तर कधी कडक उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही सात दिवस आधी मान्सून अंदमानात दाखल झाला खरा. पण बदलेल्या हवामानामुळे सध्या मान्सूनने दडी मारल्याने वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. परिणामी मुंबईतही प्रचंड उकाडा जाणवू लागलेला आहे.

सकाळी थोडेफार ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर कडक ऊन असे सध्या मुंबईतील वातावरण आहे. यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना घामाघूम होऊनच परतावे लागत आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्मा अधिक जाणवत आहे. पुढील दोन ते तीन दिवस हा उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने कर्नाटक आणि केरळात वादळी वाऱ्यांसह पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय