मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर

  Mumbai
  मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर
  मुंबई  -  

  मुंबई - केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांचं रँकिंग जाहीर केलं. या यादीत मुंबईच्या आयआयटीने तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. तर बंगळुर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने प्रथम क्रमांक पटकावलाय आणि आयआयटी चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  रँकिंगनुसार क्रमवारी

  1. आयआयएस, बेंगलूरू
  2. चेन्नई आयआयटी
  3. मुंबई आयआयटी
  4. खरगपूर आयआयटी
  5. दिल्ली आयआयटी
  6. जेएनयू
  7. कानपूर आयआयटी
  8. गुवाहाटी आयआयटी
  9. रूरकी आयआयटी
  10. बीएचयून

  इंजिनिअरिंग विद्यापीठांची क्रमवारी

  1. आयआयटी मद्रास
  2. आयआयटी मुंबई
  3. आयआयटी खरगपूर
  4. दिल्ली आयआयटी
  5. कानपूर आयआयटी
  6. रूरकी
  7. आयआयटी गुवाहाटी
  8. अण्णा विद्यापीठ चेन्नई
  9. जाधोपूर कोलकाता
  10. आयआयटी हैद्राबाद

  मोदी सरकारने संस्थांची रॅकिंग करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता असलेल्या संस्था लोकांना कळाव्यात, हा या मागचा उद्देश आहे. चांगल्या गुणवत्तेच्या संस्थांना जास्त मदत केली जाणार आहे. यावेळी पेटंट किती दाखल केले? प्लेसमेंट किती दिली? शिक्षकांची गुणवत्ता काय? या आधारावर हे रँकिंग देण्यात आल्याची माहिती प्रकाश जावडेकरांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.