Advertisement

महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर; दादरच्या भाजी मंडईत मास्कचं वाटप

मागील काही महिन्यांपासून नियंत्रणामध्ये असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर; दादरच्या भाजी मंडईत मास्कचं वाटप
SHARES

मुंबई मध्ये पुन्हा कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून नियंत्रणामध्ये असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिणामी, महापालिकेनं मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या थेट रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

भायखळा ते सीएसएमटी स्टेशन रेल्वेप्रवास आणि स्थानकांची पाहणी, शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादरच्या भाजी मंडई, फूल मार्केटमध्ये कोरोनाच्या जनजागृतीसाठी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

दादरमध्ये मास्क वाटप

दादरची भाजी मंडई ही घाऊक बाजारपेठ असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. त्यामुळं अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्कचा कटाक्षानं वापर करावा असं आवाहन करताना किशोरी पेडणेकर यांनी ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना समज देत मास्कचं वाटप देखील केलं आहे.

दादर मध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासोबत पोलिस प्रशासन देखील होते. मुंबई मध्ये सोमवारी कोरोना रूग्णांची संख्या ही मागील २४ तासांत ७६० होती. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वाढती रूग्णसंख्या पाहता आता दंडात्मक कारवाईसोबत गुन्हा दाखल करण्यासही सुरूवात झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा