Advertisement

महापौर म्हणतात, पाणी तुंबलं नाही तर साचलं!


महापौर म्हणतात, पाणी तुंबलं नाही तर साचलं!
SHARES

पहिल्याच पावसानं मुंबईची दाणादाण उडली. अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं.  रेल्वेसह रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. तुंबलेल्या या पाण्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. मात्र, तरीही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात, गुरुवारी पडलेल्या पावसामुळे पाणी तुंबलं नव्हतं तर साचलं होतं. महापालिकेनं नालेसफाईचं काम अत्यंत चागलं केलं असून त्यावर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत,  अशा शब्दांत महापालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यांनी पाठराखण केली. महापौरांच्या या वक्त्व्याचा विरोधी सदस्यांनी चांगलाच समाचार घेतला.

नालेसफाईचं काम योग्यप्रकारे झाल्याचे सांगत हे पाणी तुंबलं नव्हतं तर साचलं होतं, असं महाडेश्वर यांनी म्हटलं अाहे.  गटारांच्या झाकणांवर कचरा जमा होऊन हे पाणी साचलं होतं. तुंबलेल्या पाण्याचा निचरा त्वरीत होत नाही. त्यामुळे जिथं हे पाणी साचलं होतं, तेथील कचरा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत हटवल्यावर त्या पाण्याचा निचरा झाला. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अधिक मेहनत करत असल्याचं त्यांनी सांगितलं.


पहिल्याच पावसात दाणादाण

मुंबईत नालेसफाईचं काम योग्य प्रकारे झालेलं आहे. मेट्रोची कामे सुरु असल्यानं मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता असून याला सरकार जबाबदार असेल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विधान करत सरकारवर आरोप केला होता.  तर पहिल्याच पावसात ही दाणादाण उडाली आहे. हा ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. त्यामुळे येत्या पावसात मुंबईत पाणी तुंबण्याची भिती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.  मुंबईत पाणी तुंबण्याची २२५ ठिकाणं आहेत. परंतू, आजवर माटुंग्याच्या पारशी कॉलनीत कधी पाणी तुंबलं नव्हतं. पण तिथंही पाणी भरलं गेलं. त्यामुळे या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची ठिकाणं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.


महापौरांनी जबाबदारीनं बोलावं

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देत महापौरांचा समाचार घेतला. शनिवारी व गुरुवारी पडलेल्या पावसामुळे दादर, हिंदमाता, शीव आदी भागांमध्ये जे पाणी तुंबलं तिथं मेट्रोचं काम कुठं सुरु आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महापौरांनी जबाबदारीनं बोलावं, असं त्यांनी सांगितलं.


नालेसफाईचा देखावा 

नालेसफाईचं काम पूर्ण झाल्याचा दावा केल्यानंतरही दोन दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसात  अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. वाहतूक विस्कळीत झाली. जर पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर पुढं काय असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी नालेसफाईचं काम हे केवळ दाखवण्यापुरतं झाल्याचा आरोप केला.  प्रत्यक्षात काम झालेलं नाही, हे आम्ही पाहणी करून दाखवलं. त्याचे परिणाम या पहिल्या पावसात दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 



हेही वाचा -

Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते

संपामुळं एसटीचं १५ कोटींचं नुकसान






संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा