Advertisement

मुंबईत आणखी भाजी विक्री केंद्रे सुरु होणार

गर्दी टाळण्यासाठी आता मुंबईत आणखी भाजी विक्री केंद्रे सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

मुंबईत आणखी भाजी विक्री केंद्रे सुरु होणार
SHARES

मुंबईत नागरिक भाजी, फळे इत्यादी खाद्य विषयक खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मंडईत किंवा एकाच परिसरात ठराविक वेळी गर्दी करत असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका आहे. गर्दी टाळण्यासाठी आता मुंबईत आणखी भाजी विक्री केंद्रे सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 

 महापालिका क्षेत्रातील काही परिसरात तात्पुरत्या स्वरुपातील फळभाजी विक्री केंद्रे सुरु करण्यास  परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली. यावेळी  महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी हे निर्देश दिले असून त्यानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचेही त्यांने आदेश दिले आहेत. यानुसार भाजी फळे विक्रेत्यांना ठिकाण ठरवून देणे, वेळ ठरवून देणे, नियमांची माहिती देणे व सदर नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करणे, इत्यादी सर्व बाबतचे नियोजन व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभाग स्तरीय सहाय्यक आयुक्त (वॉर्ड ऑफिसर) यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक यांचे सहकार्य घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

यानुसार तात्पुरत्या स्वरूपातील दोन भाजी विक्रेत्यांमधील अंतर हे किमान 20 फूट असेल याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसंच सदर ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना आपापसात किमान साडेतीन फूट (एक मीटर) अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर ठिकाणी पुरेशी जागा असल्याची खातरजमा झाल्यानंतरच तात्पुरत्या स्वरुपातील भाजी विक्रेत्यांना निर्धारित वेळेत फळे, भाजी विकण्यास अनुमती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परवानगी मोठ्या रस्त्यालगत व पुरेशी जागा असलेल्या ठिकाणी देण्यात येणार आहे. विक्रेत्यांमधील किमान अंतर व दोन ग्राहकांमधील किमान अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास सदर दुकाने तात्काळ हटवण्याचे अधिकारही विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.



हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा