Advertisement

सिद्धार्थनगर हक्काच्या पाण्यापासून वंचित

अंधेरी पश्चिमेकडील (andheri west) वर्सोवा (Versova) येथील सिद्धार्थनगर (Siddharthanagar) अद्याप हक्काच्या पाण्यापासून वंचित आहे.

सिद्धार्थनगर हक्काच्या पाण्यापासून वंचित
SHARES

अंधेरी पश्चिमेकडील (andheri west) वर्सोवा (Versova) येथील सिद्धार्थनगर (Siddharthanagar) अद्याप हक्काच्या पाण्यापासून वंचित आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) अद्याप त्यांना पाणीपुरवठा केला नसल्याने येथील रहिवाशांना अवाजवी पैसे देत पाणी मिळवावं लागतं आहे. सिद्धार्थनगरवासियांना आपलं हक्काचं पाणी मिळावं यासाठी पाणी हक्क समिती प्रयत्न करत आहे.


सिद्धार्थनगर (Siddharthanagar) सन २००० पूर्वी वसलं आहे. याठिकाणी ७५० घरे आहेत. येथील लोकसंख्या जवळपास  ३ हजार ७५० आहे. हक्काच्या पाण्यासाठी पाणी हक्क समिती प्रयत्न करत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी पालिकेने अद्याप पाणीपुरवठा केलेला नाही. येथील वस्तीला पाणी मिळावे यासाठी आमची काहीएक हरकत नाही, असे पत्रच जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलं असल्याचं पाणी हक्क समिती सांगितलं आहे. येथील रहिवाशांनी २०१६ साली मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पाण्यासाठी मोर्चा काढला होता. पालिका सभागृहातही सगळ्यांना पाणी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. तसंच सर्वांना पाणी मिळेल, असे परिपत्रकही २०१७ साली काढण्यात आले होते.



त्यामुळे २०१७ साली रहिवाशांनी मुंबई महापालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) ऑनलाइन अर्ज केला. महापालिकेने २८ मे २०१८ रोजी येथील वस्तीसाठी ४२ जोडण्यांसाठीचे परवानेदेखील मंजूर केले. त्यानंतर वर्षभरानंतर पालिकेने येथे ३०० मिमीची जलवाहिनी टाकली. मार्च २०१९ मध्ये हे काम पूर्ण झाले. मात्र त्यानंतर काम पुन्हा रेंगाळले. आता केवळ जल जोडण्या देण्याचे काम शिल्लक आहे. मात्र ८ महिने उलटूनही मुंबई महापालिकेकडून काहीच कार्यवाही झाली नाही. पालिकेकडून पाणी मिळत नसल्याने येथील रहिवाशांना पैसे देऊ पाणी विकत घ्यावं लागत आहे.



हेही वाचा- 

महापालिका पायाभूत सुविधा सुधारणा कामांवर देणार भर

आता वॉर्डांची ओळख रंगावरून होणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा