Advertisement

कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर महापालिकेची मंजुरी; देशातील सर्वात मोठा प्रकल्प

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा ९.९८ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड अाहे. तीन भागांमध्ये विभागून या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात येत आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाला अखेर महापालिकेची मंजुरी; देशातील सर्वात मोठा प्रकल्प
SHARES

एल अँड टीमुंबई महापालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. विविध करांसहित तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला अाहे.  अशा प्रकारचा हा देशातील सर्वात मोठा पहिला प्रकल्प आहे. महापालिकेचा हा ड्रिम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प पुढील चार वर्षांमध्ये पूर्ण होणार असून त्यामुळे भविष्यात दक्षिण मुंबईतील प्रवास अतिसुलभ होणार आहे.


९.९८ किलोमीटर लांब

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा ९.९८ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड अाहे. प्रकल्प सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज ४), प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज १), बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज २) अशा तीन भागांमध्ये विभागून या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात येत आहे. पॅकेज ४ आणि पॅकेज १ साठी लार्सन अँड टुब्रोला (एल अँड टी) पात्र ठरली आहे. तर पॅकेज २ साठी एचसीसी व एचडीसी ही कंपनी पात्र ठरली आहे.


खर्च कसा वाढला ?

 याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला असता यावर प्रशासनाने संगणकीय सादरीकरण केले. त्यावर आयुक्तांनी स्पष्टीकारण देत १८ प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर निविदा काढण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ४ हजार कोटी रुपयांवरून हा खर्च १२ हजार कोटींवर वाढला कसा अशी विचारणा केली. तर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी या मार्गावर टॉयलेट आणि मोकळ्या जागेवर गणपती विसर्जन स्थळ, तसंच शहिदांचं स्मारक बनवण्यात यावं अशी मागणी केली. राखी जाधव यांनी हमी कालावधी २ वर्षांऐवजी ५ करण्यात यावा आणि कफ परेडमधील समुद्रात प्रकल्पाचा भराव न टाकता तो पोखरलेल्या डोंगरभागात टाकला जावा अशी सूचना केली.

तर दंडात्मक कारवाई 

यावेळी झालेल्या चर्चेत मंगेश सातमकर, सपाचे रईस शेख आदींनी भाग घेतला. मनोज कोटक यांनी एन्ट्री आणि एक्झिट मार्गात वाढ करण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकल्पाचा कालावधी वाढणार नसून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचं सांगितलं. वेळेत पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर आणि सल्लागार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी संगितलं. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून यासाठी बाहेरून अभियंत्यांची सेवा न घेता आपल्याच अभियंत्यामार्फत सेवा घेतली जात आहे. आपल्या अभियंत्यानी हे आव्हान स्वीकारलं आणि काम केलं. त्याबद्दल त्यांचे कौतुकही अायुक्तांनी केले.

 

      मार्ग 
 कंत्राटदार कंपनी  
  खर्च   
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज ४)
 एल अँड टी
५२९० कोटी रुपये)
प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज १)
एल अँड टी
३२११ कोटी रुपये
बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज २)
 एचसीसी-एचडीसी
४२२० कोटी रुपये




हेही वाचा - 
 

वारकऱ्यांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग; चालक भरतीत वारकरी उमेदवारांना प्राधान्य

कल्याणच्या पत्री पुलाच्या पाडकामाला मंगळवारपासून सुरुवात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा