Advertisement

मुंबई महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 'इतक्या' कोटींवर

कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक गणित बिघडलं आहे. अशातच कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही पाणीपट्टी वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे.

मुंबई महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 'इतक्या' कोटींवर
SHARES

कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक गणित बिघडलं आहे. अशातच कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही पाणीपट्टी वसूल करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे.  

पाणीपट्टी थकबाकीदारांनी तब्बल २८१९ कोटी रुपये थकवले आहेत. मागील दहा वर्षांतील ही थकीत रक्कम असून अभय योजना जाहीर करूनही थकीत बिलांची रक्कम वसूल होत नाही.  ही रक्कम भरण्यासाठी पालिकेने गेल्यावर्षी थकबाकीदारांना दंड रकमेत सवलत दिली होती. मात्र, थकबाकादीरांकडून कमी प्रतिसाद मिळाला.  केवळ १९३ कोटी रुपये वसूल झाले.  

पालिकेने आता थकीत रक्कम वसूल करण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे. थकीत रक्कम एकत्र भरण्याऐवजी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून तो स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे.पालिकेकडून पाणीपट्टी थकबाकी भरण्यासाठी अभय योजना जाहीर केली जाते. २०१४-१५ मध्ये थकबाकी १ हजार ११९ कोटीवर पोहचली. तेव्हा अभय योजनेतून २३४ कोटी रु. तर २०२० मध्ये अभय योजनेतून १९३ कोटी रु. वसूल झाले.

मुंबई महापालिकेच्यावतीने जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठ्याकरिता ग्राहकांना आकारण्यात येणारा दर व वापरलेले पाणी यानुसार, मीटर रिडींगप्रमाणे शुल्क आकारले जाते. चालू आर्थिक वर्षामध्ये जल आणि मलनि:स्सारण आकारापोटी १५३५.८८ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. पण कोविड काळात पाणीपट्टी वसूल होऊ शकली नाही. 

मुंबई महापालिकेच्यावतीने प्रथम १ ऑक्टोबर २०१० ते ३१ जानेवारी २०११ या १२३ दिवसांच्या कालावधीकरिता अभय योजना राबवली गेली होती. त्यानंतर अशाप्रकारे अभय योजना राबवल्या जात असून, चालू वर्षी सर्वाधिक म्हणजे २८९ दिवसांकरिता ही योजना राबवली गेली. पण या योजनेमध्ये केवळ ६७३ कोटी रुपयांची थकीत बिलांची रक्कम वसूल होऊ शकली. सध्याच्या २८१९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेत, सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. केवळ ७ टक्के थकबाकी म्हणजेच १९३ कोटी रुपयांचा महसूल वसूल झालेला आहे.



हेही वाचा -

खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा