Advertisement

नायर वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांसाठी महालक्ष्मीला वसतीगृह


नायर वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांसाठी महालक्ष्मीला वसतीगृह
SHARES

जी दक्षिण विभागातील हाजीअली येथील केशवराव खाडे मार्गावर अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्यात येत असतानाच आता याच भूखंडावरील काही भागात नायर रुग्णालयाच्या वसतीगृहासाठी ९ मजली इमारत बांधली जाणार आहे. नायर वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांसाठी वसतीगृहासहित व्यायामशाळेचंही बांधकाम केलं जाणार आहे.


९ मजली इमारत बांधणार

जी-दक्षिण हाजीअली विभागातील केशवराव खाडे मार्गावरील सीटीएस क्रमांक ४७-६ भूखंडावर नायर वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांसाठी नवीन वसतीगृह इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या याठिकाणी आरसीसी बांधकाम असलेली तळ अधिक एकमजली इमारत मोडकळीस आली असून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवर आता वसतीगृहाकरिता आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्या वतीनं स्टील्ट अधिक ९ मजली इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे.


२५ कोटी रुपये खर्च

सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून नायर वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांसाठी वसतीगृह आणि व्यायामशाळेचं बांधकाम केलं जाणार आहे. यासाठी किंजल कन्स्ट्रक्शन कंपनीची कंत्राटदार कंपनी पात्र ठरली आहे. जानेवारी महिन्यामध्ये याच भूखंडावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्याचा निर्णय घेतला होता. याठिकाणच्या दोन मोडकळीस आलेल्या इमारती पाडून नवीन आवारभिंत बांधून त्याठिकाणी जिमखाना बांधण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. यासाठी सुमारे ५७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी लँडमार्क या कंपनीची कंत्राटदार म्हणून निवड करण्यात आली आहे.


महापौरांच्या निवासस्थानाची सूचना

मात्र, या जागेवर मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचं निवासस्थान बनवण्यात यावं, अशी सूचना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांच्यासह त्यांच्या पक्षातील सदस्यांनी केली होती. परंतु ही सूचना फेटाळत सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षांसोबत हा प्रस्ताव संमत केला होता. त्यामुळे एकाच प्रांगणात दोन व्यायामशाळा बनवतानाच त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

खड्ड्यांची भूक जास्त, पण कोल्डमिक्सच कमी

खूशखबर : सॅनिटरी नॅपकीन झालं जीएसटी फ्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा