Advertisement

खूशखबर : सॅनिटरी नॅपकीन झालं जीएसटी फ्री

शनिवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २८ व्या बैठकीत सॅनिटरी नॅपकीन जीएसटी फ्री करण्याची महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

खूशखबर : सॅनिटरी नॅपकीन झालं जीएसटी फ्री
SHARES

सॅनिटरी नॅपकीनवर लावण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर अाता हटवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २८ व्या बैठकीत सॅनिटरी नॅपकीन जीएसटी फ्री करण्याची महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  जीएसटी कमी झाल्यानंतर सॅनिटरी नॅपकीनचे दर पाच ते सहा रुपयांनी कमी होतील. त्यामुळं सध्या बाजारात ३० रूपयांना मिळणारे सॅनिटरी नॅपकीन २२ ते २५ रूपयांना मिळेल.



अनेक संघटनांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून महिलांसाठी कार्यरत अनेक संस्था, संघटनांनी सॅनिटरी नॅपकीनवरील कराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलंच घेरलं होतं. यावरून अनेक संस्थांनी आंदोलनंही केली होती. त्यांनी केलेल्या या आंदोलनला यश प्राप्त झालं असून सॅनिटरी नॅपकीनवर लावण्यात आलेला जीएसटी कर पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
 

पॅडएेवजी कापडाचा वापर 

प्रत्येक महिन्यात मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे बाजारातील महागडे सॅनिटरी नॅपकीन ही महिलांची मूलभूत गरज आहे. सध्या सॅनिटरी नॅपकीनवर १२ टक्के जीएसटी लावण्यात येतो. सॅनिटरी पॅड हा महिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे पॅड त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्याची किंमत जास्त असल्याने गरीब किंवा मध्यमवर्गीय महिलांना ते पॅड परवडत नाही. त्यामुळे अनेक महिला त्याऐवजी कापडाचा वापर करतात. कापडाचा वापर आरोग्यास हानिकारक असल्याचं माहीत असूनही अनेक महिला याचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.



सॅनिटरी नॅपकीनविषयी मुंबईत जागृती असली तरीही खेडेगावात याबाबत अजूनही माहिती नाही. याबाबत जनजागृती करत असतानाच अचानक त्यावर सरकारनं जीएसटी कर लावला. या करामुळं अनेक खेडेगावातल्या हातावर पोट असलेल्या महिलानां पॅड खरेदी करणं परवडत नव्हतं. त्यामुळे मी या विरोधात अनेक आंदोलनं केली. नॅपकीन ही सर्व महिलांची मूलभुत गरज असून सरकारनं त्यावरील कर हटवावा अस पत्रही मी त्यांना दिलं होतं. जीएसटी हटवल्याने मी खूप खूश आहे.
 - छाया काकडे, विचारधारा ग्रामीण विकास संस्था, लातूर



सॅनिटरी नॅपकीन ही महिलांची गरज असल्यानं त्यावर जीएसटी लावणं योग्य नाही. जीएसटी हटवल्यानं मी आता सॅनिटरी नॅपकीन खरेदी करू शकते. यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे पैशांची थोडी बचतही होईल.
- प्रियंका जाधव, विद्यार्थीनी



हेही वाचा -

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : अखेर 'त्या' विद्यार्थ्याचा राखीव जागेवरच प्रवेश

किंग्ज सर्कल, मुंबई सेंट्रलसह अन्यही स्थानकांचं लवकरच नामकरण



 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा