Advertisement

किंग्ज सर्कल, मुंबई सेंट्रलसह अन्यही स्थानकांचं लवकरच नामकरण

मुंबईतील ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा धोरणात्मक निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल, सॅण्डहर्स्ट रोड, चर्नीरोड, करी रोड, काॅटनग्रीन आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावं ब्रिटीशकालीन आहेत. त्यामुळं येत्या काळात या सर्वच स्थानकांची नावं बदलण्याची शक्यता आहे.

किंग्ज सर्कल, मुंबई सेंट्रलसह अन्यही स्थानकांचं लवकरच नामकरण
SHARES

मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांच्या नावांच्या नामकरणाचा धडका रेल्वेनं लावला आहे. नुकतंच एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव 'प्रभादेवी' करण्यात आलं आहे. आता त्यापाठोपाठ 'किंग्ज सर्कल'चं नामकरण 'पार्श्वनाथ स्थानक' तर 'मुंबई सेंट्रल'चं नाव 'जगन्नाथ शंकर शेठ' असं नाव देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.



'या' स्थानकांची नावं बदलणार?

मुंबईतील ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा धोरणात्मक निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल, सॅण्डहर्स्ट रोड, चर्नीरोड, करी रोड, काॅटनग्रीन आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावं ब्रिटीशकालीन आहेत. त्यामुळं येत्या काळात या सर्वच स्थानकांची नावं बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात एल्फिन्स्टन स्थानकाचं नाव प्रभादेवी असं करण्यात आलं आहे.


राहुल शेवाळेंची मागणी

'एल्फिन्स्टन'चं नाव 'प्रभादेवी' झाल्यानंतर शेवाळे यांनी सोमवारी संसदेत 'किंग्ज सर्कल' रेल्वे स्थानकाचं नाव बदलून 'पार्श्वनाथ स्थानक' करण्याची मागणी केली आहे. 'किंग्ज सर्कल' स्थानक मांटुगा सायनच्या मध्ये येतं आणि या परिसरात जैन धर्मीय मोठ्या संख्येनं राहतात. तर याच परिसरात जैन मंदिरही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं गेल्या कित्येक वर्षांपासून 'किंग्ज सर्कल' रेल्वे स्थानकाला 'पार्श्वनाथ' स्थानक नाव देण्याची मागणी होत होती. त्यानुसार आपण ही मागणी संसदेत ठेवल्याचंही शेवाळे यांनी स्पष्ट केलं आहे.


'दादरचं नाव बदलणार नाही'

या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाकडून यासंबंधीची कारवाई सुरू असून डिसेंबर अखेरीस किंग्ज सर्कलचं नाव बदलेल असंही शेवाळे यांनी सांगितलं. तर मुंबई सेंट्रलचं नाव जगन्नाथ शंकर शेठ करण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्याची मागणी आंबेडकर अऩुयायांकडून होत आहे. याबद्दल शेवाळे यांना विचारलं असता ब्रिटीशकालीन नाव बदलण्याचं धोरण असल्यानं दादर हे नाव त्यात येत नसल्याचं सांगत दादरचं नाव बदलणार नसल्याचे संकेत दिले आहेत.


हेही वाचा - 

एल्फिन्स्टन झालं प्रभादेवी!

'सीएसटी'चं झालं 'सीएसटीएम'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा