Advertisement

कोराना रुग्णांच्या परिसराची माहिती मिळणार पालिकेच्या संकेतस्थळावर

मुंबईत ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत त्या सर्व परिसरांचे 'जीआयएस मॅपिंग' आता मु्ंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोराना रुग्णांच्या परिसराची माहिती मिळणार पालिकेच्या संकेतस्थळावर
SHARES

मुंबईत ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत त्या सर्व परिसरांचे 'जीआयएस मॅपिंग' आता मु्ंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. मुंबईत ज्या परिसरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

नागरिकांनी आपली काळजी घेण्यासाठी तसंच प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करणे सुलभ व्हावे या उद्देशाने याबाबतची माहिती संकेतस्थळाद्वारे सार्वजनिक करण्यात येणार आहे. या माहितीद्वारे कोरोनाचे रुग्ण असलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अधिक सजगपणे स्वतःची काळजी घेणं सोपं जाणार आहे. तसंच त्या परिसरात काही आवश्यक कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनाही अधिक सहजपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येऊ शकेल.

महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांनी घरामध्येच राहणे आणि आपली काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या परिसरात बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरातील नागरिकांना तुलनेने अधिक काळजी घेणे, अत्यंत गरजेचे आहे.  सध्या देशात 1613 कोरोनाग्रस्त आहेत. तर यापैकी 35 लोकांचा मृत्यू झाला असून 148 लोकांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी 72 नवे रूग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 300 च्या वर गेला आहे.



हेही वाचा -

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा