कोरोना लक्षणं आढळणाऱ्यांवर उपचारासाठी पालिकेकडून फिव्हर क्लिनिक

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आटोकाट प्रयत्न करीत आहे. पालिका आता मुंबईत फिव्हर क्लिनीक सुरू करणार आहे.

कोरोना लक्षणं आढळणाऱ्यांवर उपचारासाठी पालिकेकडून फिव्हर क्लिनिक
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आटोकाट प्रयत्न करीत आहे. पालिका आता मुंबईत फिव्हर क्लिनीक सुरू करणार आहे. मुंबईतील नागरिकांमध्ये कोरोना सदृश्य आजाराची लक्षणं आढळल्यास त्यांच्यावर या फिव्हर क्लिनीकमध्ये प्राथमिक उपचार करण्यात येणार आहे. याशिवाय पालिका ठिकठिकाणी आरोग्य शिबीरांचं आयोजन करणार आहे.

या फिव्हर  क्लिनिकमध्ये फक्त ताप, सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यात येणार असल्याचं महापालिकेने सांगितलं. मुंबईतल्या २४ वॉर्डांमधील विविध ठिकाणी हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर झोपडपट्टी परिसरांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. 

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नगरसेवक-अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक झाली. या बैठकीला पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशीही उपस्थित होते. यावेळी मुंबईत खासगी डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेवल्याने त्यावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींवर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येतील. तर लागण झाल्यासारखी लक्षणे असणाऱ्या, म्हणजेच 'ताप - सर्दी - खोकला' असणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेच्या दवाखान्यात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात अथवा महापालिकेने 'कोरोना‌' विषयक उपचारांसाठी प्राधिकृत केलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.हेही वाचा -

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार
संबंधित विषय