Advertisement

रहिवाशांचे पूर्ण लसीकरण झालेल्या 'इतक्या' सोसायटींना क्यूआर कोड

स्थानिकांना संपूर्ण लस टोचण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

रहिवाशांचे पूर्ण लसीकरण झालेल्या 'इतक्या' सोसायटींना क्यूआर कोड
SHARES

रहिवाशांचे दोन्ही डोस झालेल्या इमारतींवर क्यूआर कोड लावण्यात याव्येत असे आदेश पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार मुंबईतील जवळपास १०,००० गृहनिर्माण सोसायट्यांना हा क्यूआर कोड प्राप्त झाले आहेत. स्थानिकांना संपूर्ण लस टोचण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी १०,००० हून अधिक सोसायट्यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे क्यूआर कोड कसे मिळाले याची माहिती दिली आहे. हे शिक्के पोस्टरच्या माध्यमात आहेत जे क्यूआर कोडसह डिझाइन केलेले आहेत.

त्यात “माय सोसायटी, रिस्पॉन्सिबल सोसायटी” असा संदेश आहे. लोगो व्यतिरिक्त, एक QR कोड देखील येतो जो वापरकर्त्यांना नागरी प्राधिकरणाच्या वेबसाइटवर घेऊन जातो.

उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यांचे कर्मचारी सोसायट्यांमध्ये गेले आहेत आणि अगदी सोसायट्यांनीही कर्मचार्‍यांशी संपर्क साधला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अंदाजानुसार शहरामध्ये जवळपास ३७ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. काकाणी यांना मात्र खरी संख्या काही जास्त असू शकते असं वाटतं.

या व्यतिरिक्त, मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्रातील ३ कोटी पेक्षा जास्त नागरिकांना कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळाले. जिल्ह्यांमध्ये मुंबई आघाडीवर असून त्यानंतर पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांचा क्रमांक लागतो.



हेही वाचा

वाहनांसाठी नवी नियमावली, चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्राचा प्रस्ताव

पवई सायकल ट्रॅकसाठी एकही झाड तोडलं जाणार नाही : आदित्य ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा