Advertisement

मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांत ११०० 'विशेष पोलिस'

प्रतिबंधित क्षेत्रातील स्वच्छ प्रतिमेची, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती शोधून तिला 'विशेष पोलिस' म्हणून दर्जा दिला जात आहे.

मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांत ११०० 'विशेष पोलिस'
SHARES

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच यंत्रणांवर मोठा ताण आला आहे.  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बंदोबस्त, नाकाबंदी आणि इतर कामांबरोबरच प्रतिबंधित क्षेत्रावर नजर ठेवावी लागत असल्याने पोलिसांवर मोठा ताण आला आहे. यासाठी मोठं मनुष्यबळ लागत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे.  

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी यासाठी नागरिकांना सामावून घेण्यास सुरुवात केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील स्वच्छ प्रतिमेची, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती शोधून तिला 'विशेष पोलिस' म्हणून दर्जा दिला जात आहे. मुंबईतील ११०० जणांना आतापर्यंत 'विशेष पोलिस' म्हणून विशेषाधिकार देण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात कुणी नियमभंग करीत असल्यास त्याची समजूत काढणे, तो ऐकत नसल्यास याबाबतची माहिती पोलिसांना देणे आदी जबाबदारी या विशेष पोलिसावर असते.

पोलिस आपल्या हद्दीत येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील माहिती घेऊन त्या क्षेत्रातील एखादा शिक्षित रहिवाशी, सोसायटीचा पदाधिकारी किंवा लोकांच्या परिचयात असलेला चेहरा शोधतात. त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. विशेषाधिकार दिला जाणारा व्यक्ती गैरफायदा घेणारा नाही याबाबत खात्री पटल्यानंतर त्या व्यक्तीला पोलिस विशेषाधिकार दिला जातो. 

पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला खाद्या व्यक्तीला विशेष पोलिस म्हणून नेमण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम २१ (२) (ब) अन्वये पोलिस अधिकाऱ्यास जे अधिकार, कामे व विशेषाधिकार आहेत ते सर्व या व्यक्तीस लागू असतात.



हेही वाचा -

मुंबई महानगरात १४ नवे ऑक्सिजन प्लांट उभारणार

घरोघरी जाऊन होणार रुग्णांची तपासणी, पालिकेकडून १० जणांची टीम तयार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा