Advertisement

खाकीतील 'देव'माणूस, १४ दिवसाच्या बाळाला दिलं जीवनदान

सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला ३ हजारांपेक्षा जास्त युजर्सनी लाईक केलं आहे.

खाकीतील 'देव'माणूस, १४ दिवसाच्या बाळाला दिलं जीवनदान
SHARES

मुंबई पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलनं एका १४ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. या कॉन्स्टेबलचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला ३ हजारांपेक्षा जास्त युजर्सनी लाईक केलं आहे.

ज्याला देव तारे त्याला कोण मारे ही म्हण तर सर्वांनाच माहित असेल. एका १४ दिवसांच्या बाळासाठी एक पोलिस कॉन्स्टेबल देवासारखा धाऊन आला. एका १४ दिवसांच्या बाळानं नकळत सेफ्टी पिन गिळली होती. अशा स्थितीमध्ये कॉन्स्टेबल श्रीमंत कोळेकर देवदूत बनून मदतीला धावला.

मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, कोळेकर यांनी स्वतःच्या गाडीनं सेफ्टी पिन गळ्यात अडकलेल्या बाळाला हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. जिथं त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.

कोळेकर यांनी बाळाच्या पालकांना रस्त्यावर पाहिलं. बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकल्याचं समजताच कोळेकर यांनी क्षणाचाही विचार न करता त्वरित पालकांना केईएम हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. यासाठी त्यांनी स्वतःच्या गाडीनं पालकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. कोळेकर यांच्या मदतीनं वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर डॉक्टरांनी बाळावर इलाज केला.


हेही वाचा

पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज

भारतातील पहिल्या मोबाईल लॅबचं उद्घाटन, होणार अधिक चाचण्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा