Advertisement

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना 'ही' भेट


रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना 'ही' भेट
SHARES

समुद्र किनाऱ्यांवर (Beach) टेहळणी आणि बचाव कार्य करण्यासाठी विशेष वाहनांची (Special Vehicle) गरज असते. अशाच 10 RANGER 570 efi गाड्यांचं मुंबई पोलिस (Mumbai Police) दलात आगमन झालं आहे. 

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray) हस्ते या गाड्या पोलिस दलात सहभागी करण्यात आल्या. त्यामुळं आता समुद्रावर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांना या गाड्यांचा मोठा फायदा होऊ शकणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे (Reliance Foundation) देण्यात आलेल्या या अद्यावत गाड्यांचा वापर बीच पेट्रोलिंगसाठी केला जाणार आहे. ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये समुद्र किनारे येतात अशा सर्व पोलिस ठाण्यांना ही नवी अद्ययावत वाहनं दिली जाणार आहेत. त्यामुळं समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालणं आणि बचावकार्य करणं आणखी सोपे होणार असल्याचा विश्वास मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला आहे.


'या' वाहनाचं वैशिष्ट्य

  • पॉवर स्टेअरिंग, अ‍ॅडजस्टेबल स्टेअरिंग, स्टॅंडर्ड 2 मोड, भरपूर स्पेस, गॅस असिस्टंट डम्प बॉक्सक्स या गाडीत देण्यात आले आहेत.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे खडकाळ किंवा भुसभुशीत अशा कोणत्याही भागात अडकू नये यासाठी वेर्सा ट्रॅक टर्फ मोडही या गाडीत देण्यात आला आहे. 
  • दणकट, अद्यावत, वापरायला सोप्या आणि भरपूर फायदेशीर अशी याची वैशिष्ट्य
  • वाहनाची 570 सीसी अशी उच्च क्षमता आहे. त्यामुळे ही वाहनं वेगवानही आहेत.
  • बंदोबस्तावरील ४ जण या वाहनातून गस्त घालू शकतात.
  • आणीबाणीच्या प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हूक्स (Floating Hooks) अशा सुविधांचाही वापर करता येईल.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना या गाड्या देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवत या गाड्या दलात दाखल केल्या.

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर झालेल्या या गाड्यांच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह खासदार अरविंद सावंत आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या सिराज कोतवाल हे उपस्थित होते.



हेही वाचा

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांना नवी मुंबई पालिकेकडून १ हजार रूपये

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा