Advertisement

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू वाहतूक नियमांची जबाबदारी मुंबई पोलिसांवर

या सागरी सेतूवर ताशी 100 किमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे.

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू वाहतूक नियमांची जबाबदारी मुंबई पोलिसांवर
SHARES

सुमारे 22 किमी लांबीच्या शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या 10.4 किमीच्या आत वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे, तर उर्वरित भाग नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारीत येईल. या सागरी सेतूवर ताशी 100 किमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे.

'अटल सेतू' शुक्रवार, 12 जानेवारी रोजी सुरू होत असल्याने वडाळा, पायधुनी आणि आझाद मैदान वाहतूक पोलिस विभागांना अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  देण्यात आला आहे.

सध्या रफी किडवई मार्गावरील या पुलावरून बाहेर पडण्याची कोणतीही व्यवस्था नाही, पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. अटल सेतूच्या 10,400 किमी लांबीच्या रस्त्यावर वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे.

वडाळा वाहतूक विभागाकडे वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. याशिवाय या पुलामुळे पूर्व मुक्त मार्ग आणि आझाद मैदान परिसरातही वाहनांची संख्या वाढणार असून तीन वाहतूक चौक्यांना अतिरिक्त वाहतूक पोलिस देण्यात आले आहेत. उर्वरित भाग नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारीत येणार आहे.

या पुलावर ताशी 100 किमी वेगाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, चढावर आणि उतारावर 40 किमी प्रतितास वेग असेल. या पुलावर तीनचाकी व दुचाकी वाहनांना बंदी आहे. या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून पुलावरील वाहतुकीवर लक्ष ठेवता येणार आहे.

मुंबई ते कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात आरामदायी प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा पूल बांधला असून प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी प्राधिकरणाने सुमारे 30 वर्षांसाठी रस्ता कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा

ठाणे खाडी पुलावरील टोलबाबत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर?

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - संजय राऊत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा