Advertisement

‘या’ ठिकाणी सीसीटीव्ही लागलेच पाहिजे, मुंबई पोलिसांची तातडीची सूचना

पोलिस तपास तसंच गुन्हा नियंत्रण व गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सी.सी.टी.व्ही फुटेजचा मोठा उपयोग होवू शकतो. त्या संदर्भात खाजगी आस्थापनाने सी.सी.टी.व्ही. लावावेत असे निर्देश देण्यात आले होते.

‘या’ ठिकाणी सीसीटीव्ही लागलेच पाहिजे, मुंबई पोलिसांची तातडीची सूचना
SHARES

मुंबईतील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. परंतु अजूनही काही खासगी आस्थापनांनी या सूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्याने यासंदर्भात तातडीने आदेश काढण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील खाजगी आस्थापनावर सी. सी. टी. व्ही. कॅमेरा लावण्यासंदर्भात बृहन्मुंबई पोलिसांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश पोलिस उप आयुक्त (ऑपरेशन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस. चैतन्य यांनी दिले आहेत.

पोलिस तपास तसंच गुन्हा नियंत्रण व गुन्ह्यांची उकल होण्यासाठी सी.सी.टी.व्ही फुटेजचा मोठा उपयोग होवू शकतो. त्या संदर्भात खाजगी आस्थापनाने सी.सी.टी.व्ही. लावावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अद्यापही काही खाजगी आस्थापनांनी  सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावलेला नाही. 

हेही वाचा- “माझा दीड वर्षांचा अनुभव आहे, मी घरातूनच राज्य चालवतोय…”

त्यानुसार पुढील निर्देशित खाजगी आस्थापना १) बँक, २) एटीएम, ३) वित्तीय संस्था, ४) ज्वेलरी शॉप, ५) हॉटेल, ६) विश्राम गृह, ७) रेस्टॉरंट, ८) बार व पब, ९) वाईन व बियर शॉप, १०) निवासी संकूल, ११) कार्यालय इमारत, १२) नवीन तसंच बांधकामाधीन निवासी संकूल/कार्यालय, १३) पेट्रोलपंप, १४) शॉपिंग मॉल, १५) शॉपिंग कॉम्प्लेक्स, १६) सुपर मार्केट, १७) जीम, १८) खेळाची मैदाने, १९) चित्रपटगृह व कॉम्पलेक्स, २०) शैक्षणिक संकूल, २१) प्रार्थना स्थळे, २२) दवाखाने, २३) पुतळ्यांच्या सुरक्षा व देखभालीसाठी नेमलेल्या संस्था/संघटना यात आदींचा समावेश आहे.

या खाजगी आस्थापनांनी साधारणत: ५० मीटर पर्यंतचा त्यांचा परिसर रेकॉर्ड होईल असे कॅमेरे लावावेत. तसंच ते सुस्थितीत असतील याची खात्री करावी. त्याची चित्रीकरण यंत्रणा उत्तम प्रतिची तसंच कमीत कमी १५ दिवसांचे रेकॉर्डिंग होईल अशी असावी. पोलिसांनी मागणी केल्यास सदरील रेकॉर्डिंग पोलिसांना द्यावं. तसंच काही संशयास्पद आढळून आल्यास त्याची कल्पना जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी. सदरील निर्देश १२ मे २०२१ ते १० जुलै २०२१ या कालावधीसाठी आहेत, असंही या आदेशात म्हटलं आहे.

(mumbai police issues notification for CCTV installation in private farms for safety reasons)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा