Advertisement

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट

दिल्ली स्फोटानंतर देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
SHARES

राजधानी दिल्लीतला सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी एका बाँब स्फोटानं हादरला. हा LED स्फोट इस्रायल दूतावासाजवळ झाला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटानं राजधानी हादरली आहे.

दिल्ली स्फोटानंतर देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

विमानतळ आणि सरकारी इमारतींचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इस्रायल एम्बसीजवळ स्फोट झाल्यानं मुंबईतही ज्यूंची वर्दळ असणाऱ्या नरिमन हाउसची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला. हा भाग दिल्लीतला सगळ्यात हाय प्रोफाइल भागाजवळ आहे. स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकापासून फक्त दीड किलोमीटरवर आहे. याच विजय चौकात बीटिंग रीट्रीट (Beating the retreat) कार्यक्रम सुरू होता. फक्त या कार्यक्रमामुळे स्फोटाच्या हानीचं प्रमाण कमी झालं.

दरवर्षीप्रमाणे २६ जानेवारीनंतर राष्ट्रपती भवनाजवळ हा बीटिंग रीट्रिटचा कार्यक्रम होतो. त्यासाठी विजय चौकापासूनच मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त असतो. तसंच या परिसरातले रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद केले जातात.

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) दिल्लीतील सर्व विमानतळ, महत्वाची स्थापना आणि सरकारी इमारतींवरही सतर्कतेचा इशारा दिला आहे.



हेही वाचा

‘लायटर पिस्टल’च्या मदतीने तरुणाने केली मोबाइल चोरी

कांदिवलीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत आरोपींना अटक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा