Advertisement

...म्हणून पोलिसांनी तिला पाठवला वाढदिवसाचा केक

ट्विटरवर मुंबई पोलिस हटके उत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी सुद्धा असच काहिसं झालं आहे. पोलिसांच्या एका कृतीमुळे सर्वांचीच मनं जिंकली.

...म्हणून पोलिसांनी तिला पाठवला वाढदिवसाचा केक
SHARES

ट्विटरवर मुंबई पोलिस हटके उत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी सुद्धा असच काहिसं झालं आहे. पोलिसांच्या एका कृतीमुळे सर्वांचीच मनं जिंकली. मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी चक्क वाढदिवासाचा केक पाठवला. आता तुम्ही म्हणाल हिला एवढी स्पेशल ट्रिटमेंट का? कोण लागून गेली? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

पण झालं असं की, मुंबईच्या रहिवासी असलेल्या समिता पाटील यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणी त्यांना पार्टी मागत होत्या. मात्र समिता यांनी त्यांना लॉकडाऊन असल्यानं घरातच राहायचा सल्ला दिला. यासंदर्भातील व्हॉट्सअप चॅटचा फोटो ट्विटरवर टाकत मुंबई पोलिसांना टॅग केलं. त्यांच्या कतीनं त्या एक जबाबदार नागरिक असल्याचं स्पष्ट झालं.

ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत समिता यांनी म्हटलं की, “लॉकडाऊन आहे, त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा” असं उत्तर दिलं. या गप्पा त्यांनी मुंबई पोलिसांसोबतही शेअर केल्या.

त्यावर मुंबई पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्याकडे त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला. तसंच जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचं कौतुक करणारा एक मेसेजही पाठवला.

इतकंच नाही अवघ्या काही क्षणात मुंबई पोलिसांनी समताला एक सरप्राईज देत तिच्या घरी एच चॉकलेट ट्रफल केक मागवला. या केकवर Responsible Citizen असं लिहिलं होतं. समतानं केकचे फोटो ट्विटरवर शेअर करत पोलिसांना धन्यवाद दिला. शिवाय पोलिसांच्या या कृतीमुळे दिवस चांगला गेला असंही पोस्टमध्ये म्हटलं.

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती आणि या केकचा फोटो शेअर केला आहे. पोलिसांनी ट्विटमध् म्हटलं आहे की, “तुमच्या खास दिवशी घरी राहिल्याबद्दल आणि जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल आमच्याकडून तुमच्या कौतुकाचा हा छोटासा प्रयत्न. आजचं तुमचं हे सुरक्षित सेलिब्रेशन आपल्या शहराला उद्या आनंदी कऱेल. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

दुसर्‍या घटनेत एका नागरिकानं सोशल मीडियावर ट्रॉम्बे इथल्या डायलिसिस रूग्णाबद्दल पोलिसांना माहिती दिली. वाढदिवस असूनही त्यानं आपला वाढदिवस साजरा केला नसल्याचं कळताच मुंबई पोलिसांनी त्याला देखील असंच सरप्राईज दिलं.

ट्रॉम्बे पोलिसांनी तातडीनं रुग्ण  नीना मैलारे यांना भेट दिली. त्यांना केक आणि फुलं देऊन त्यांना सरप्राईज दिलं. पोलिसांच्या या कृतीमुळे सहा वर्षांपासून डायलिसीसवर असलेल्या मिलारे यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.  



हेही वाचा

मुंबई महानगरात १४ नवे ऑक्सिजन प्लांट उभारणार

घरोघरी जाऊन होणार रुग्णांची तपासणी, पालिकेकडून १० जणांची टीम तयार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा