Advertisement

मुंबई पोलिसांचा इतिहास होणार संग्रहित


मुंबई पोलिसांचा इतिहास होणार संग्रहित
SHARES

मुंबई पोलिस दलाला मोठा इतिहास असला तरी त्याची अधिकृत आणि एकत्रित नोंद अद्याप कुठेही झालेली नाही. गुन्हेगारांचा 'इतिहास' संग्रहित करणाऱ्या मुंबई पोलिसांचा इतिहास आता संग्रहित केला जाणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या संकल्पनेतून नुकतीच 'मुंबई पोलिस फाऊंडेशन' या धर्मादाय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलिसांचा सर्वांगिण विकास आणि 'मुंबई पोलिस वस्तू संग्रहालया'चे काम करण्यात येणार अाहे.


पोलीस दलाची निर्मिती रंजक

मुंबई पोलिस दलाची निर्मितीही रंजक आहे. सात बेटांचं संरक्षण करण्यासाठी १६७२ पासून रक्षक नेमले गेले. मात्र अधिकृत आणि शिस्तबद्ध मुंबई पोलिसांची ही ओळख १८६४ पासूनची आहे. स्वातंत्र्यानंतर पोलिस दलात बरेच बदल झाले, विशेषत: पोलिसांचे गणवेश कायम चर्चेत राहिले. हाफ पॅन्टमधील पोलिस अधिकारी फूल पॅन्टमध्ये कसा आला. पोलिसांचा आजपर्यंतचा प्रवास, नामकिंत अधिकाऱ्यांची कर्तबदारी याबाबत आजही अनेकांना पूर्ण माहिती नाही.


साकारणार मुंबई पोलीस वस्तुसंग्रहालय

पोलिस तपासावर अनेकांनी पुस्तके लिहिली आहेत. मात्र पोलिसांता तसा इतिहास कुणीही लिहिलेला नाही. देशाच्या आर्थिक राजधानीचं रक्षण करणाऱ्या मुंबई पोलिसांचे कुठेही संग्रहालय नाही. त्यामुळेच सेवाभावी योजनांतून पोलीस दलाच्या सर्वांगिण विकासासाठी मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या संकल्पनेतून 'मुंबई पोलिस फांऊडेशन'ची स्थापना करण्यात अाली आहे. या फांऊंडेशनच्या माध्यमातूनच पोलिस आयुक्तालयाच्या आवारात 'पुरातन अभिलेख विभागा'च्या मदतीनं 'मुंबई पोलिस वस्तूसंग्रहालय' साकारण्यात येणार आहे.


टाटा ट्रस्टकडे अार्थिक जबाबदारी

'मुंबई पोलिस वस्तूसंग्रहालय' आणि 'पुरातन अभिलेख विभागा'च्या निर्मितीसाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाची जबाबदारी 'टाटा ट्रस्ट'ने स्वीकारली आहे. याबाबत १० मे रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयात मुंबई पोलीस, मुंबई पोलीस फांऊडेशन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वस्तूसंग्रहालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हे वस्तूसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

हे काय भलतंच? पोलिस शिपायाला मागायचीये गणवेशात भीक!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा