पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू


पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
SHARES

मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा विभागात कार्यरत असलेल्या नरेंद्र शिंदे यांच्या मुलाचा संशयास्पद मृतदेह आरे परिसरात मंगळवारी सापडला. अथर्व शिंदे (२०) असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरे पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करत तपास सुरू केला आहे. ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितलं.


पार्टीसाठी पडला घराबाहेर 

आरे काॅलनीतील राॅयल पाम परिसरात अथर्व त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. रविवारी मित्राच्या पार्टीसाठी अथर्व संध्याकाळी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. त्यामुळे नरेंद्र यांनी आरे पोलीस ठाण्यात अथर्व बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.


अारे जंगलात सापडला मृतदेह

अखेर आरे जंगलात निर्जनस्थळी स्थानिक रहिवाशांना अथर्वचा मृतदेह सापडला. याबाबत स्थानिकांनी आरे पोलिसांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथर्वच्या मानेवर काही संशयास्पद खुणा पोलिसांना आढळून आल्या आहेत. तर तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच अथर्वसोबत काय झाले, हे कळू शकेल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा -

किर्ती व्यासचा मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ला? शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर

हाय हिल्स सॅण्डल्समुळे ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा