Advertisement

हिंदी गाण्यांमुळे तो पुन्हा सापडला; ४० वर्ष होता बेपत्ता!

मणिपूरच्या इम्फाळमधून ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९७८ साली खोमड्राम गंभीर सिंग गायब झाले होते. त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या गायब होण्याची तक्रारही पोलिसांत दाखल केली होती. मात्र, त्यांची कोणतीही माहिती त्यांच्या घरच्यांना मिळाली नाही. त्यावेळी त्यांचं वय होतं २६ वर्ष. पण तब्बल ४० वर्षांनंतर एका यूट्यूब व्हिडिओमध्ये अचानक त्यांना खोमड्राम सिंग दिसले आणि त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही!

हिंदी गाण्यांमुळे तो पुन्हा सापडला; ४० वर्ष होता बेपत्ता!
SHARES

सोशल मीडियाचे कितीही तोटे आहेत असं आपण म्हटलं, तरी त्यामुळे खूप काही गोष्टी साध्यही करता येऊ शकतात. अगदी ४० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली व्यक्तीही सापडू शकते! कशी? मुंबई पोलिसांना विचारा!

यूट्यूब व्हिडिओने केली कमाल!

मणिपूरच्या इम्फाळमधून ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९७८ साली खोमड्राम गंभीर सिंग गायब झाले होते. त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या गायब होण्याची तक्रारही पोलिसांत दाखल केली होती. मात्र, त्यांची कोणतीही माहिती त्यांच्या घरच्यांना मिळाली नाही. त्यावेळी त्यांचं वय होतं २६ वर्ष. पण तब्बल ४० वर्षांनंतर एका यूट्यूब व्हिडिओमध्ये अचानक त्यांना खोमड्राम सिंग दिसले आणि त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही!

बॉलिवूड गाण्यांचा होता छंद!

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील फोटोग्राफर फिरोज शकीर यांनी एक व्हिडिओ शूट करून यूट्यूबवर अपलोड केला होता. सिंग यांना बॉलिवूड चित्रपटांमधली गाणी गाण्याचा छंद होता. त्यामुळे मुंबईत ते गाणी गात असताना शकीर यांना ते आवडलं आणि त्यांनी ते शूट करून व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला.

वांद्रे पोलिसांनी काढलं शोधून

हा व्हिडिओ पाहून सिंग यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घरच्यांना याबद्दल माहिती दिली. सिंग यांची ओळख पटताच त्यांनी इम्फाळच्या पोलिसांशी संपर्क साधला. इम्फाळ पोलिसांनी वांद्रे पोलिसांना याबाबत कळवताच त्यांनी लागलीच सूत्र हलवली आणि खोमड्राम गंभीर सिंग यांना शोधून काढलं.

आत्ता सिंग यांचं वय ६६ आहे. गेली ४० वर्ष खोमड्राम मुंबईतच होते की आणखी कुठे याबाबत मुंबई पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही. मात्र, ही बाब लक्षात येताच सिंग यांचे कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आणि त्यांना पुन्हा घरी घेऊन गेले. सिंग यांनी इम्फाळ रायफलमध्ये अनेक वर्ष सेवा दिली आहे.हेही वाचा

लव्हाटे दाम्पत्याची इच्छामरणाच्या निर्णयाला स्थगिती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement