Advertisement

समुद्रातील कचरा उचलण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची नवी मोहीम

गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी (एलिफंटा), रेवस, मांडवा यासाठी अनेक प्रवासी बोटीने ये-जा करतात. त्यामुळे अनेक बोटींची वर्दळ येथील समुद्रात असते. अनेक प्रवासी खाद्यपदार्थ खाऊन झालेला कचरा, खाद्यपदार्थांची वेष्टने समुद्रात फेकतात.

समुद्रातील कचरा उचलण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची नवी मोहीम
SHARES

समुद्रातील कचरा उचलण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने आता एक नवी मोहीम आखली आहे. बोटीद्वारे हा कचरा उचलला जाणार आहे. यासाठी ज्योतीकेअर बेनव्हेलंट फाऊंडेशनने वॉटर गार्बेज स्कूपर ही यांत्रिक बोट मुंबई पोर्ट ट्रस्टला उपलब्ध करून दिली आहे. या बोटीच्या सहाय्याने एका फेरीतून ३० ते ४० किलो कचरा काढण्यात येणार आहे. 

गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी (एलिफंटा), रेवस, मांडवा यासाठी अनेक प्रवासी बोटीने ये-जा करतात. त्यामुळे अनेक बोटींची वर्दळ येथील समुद्रात असते. अनेक प्रवासी खाद्यपदार्थ खाऊन झालेला कचरा, खाद्यपदार्थांची वेष्टने समुद्रात फेकतात. हा कचरा लाटांमुळे किनाऱ्यावर येऊन समुद्रकिनारे गलिच्छ होतात. वॉटर गार्बेज स्कूपरने कचरा उचलण्याचे काम अधिक वेगाने होईल. २२५ किलो वजनाची ही बोट कोचीन येथून आणली आहे. ही बोट दोन व्यक्ती ती हाताळतात. एका फेरीतून स्कूपर जवळपास ३० ते ४० किलो कचरा गोळा करू शकते.

पोर्ट ट्रस्टच्या दोन बोटी वर्षांचे बाराही महिने समुद्रात कचरा गोळा करण्यासाठी तैनात आहेत. एक बोट समुद्रात इतरत्र पसरलेला कचरा गोळा करण्याच काम करते. दुसरी बोट जवाहर द्वीपाजवळ तैनात आहे. ती बोट त्या परिसरातील कचरा गोळा करून किनाऱ्यावर आणते. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात रोज ३०० किलो कचरा जमतो.हेही वाचा  -

वाहनचालकांनो सावधान! दंड न भरल्यास माराव्या लागणार कोर्टाच्या फेऱ्या

तानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली
 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा