Advertisement

मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या बाहेरील रस्ता खचला, मेट्रोच्या उत्तरेकडील एक्झिट मार्ग तात्पुरता बंद

मेट्रोने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.

मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या बाहेरील रस्ता खचला, मेट्रोच्या  उत्तरेकडील एक्झिट मार्ग तात्पुरता बंद
SHARES

मुंबईत शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे. 

मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या बाहेर देखील पाणी साचल्याची माहिती मेट्रोकडन देण्यात आली आहे. यामुळे मेट्रो स्थानकातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. 

मेट्रोने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांसाठी महत्वाची सूचना! मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ @mybmcच्या अखत्यारित येणारा रस्ता खचल्याने आपल्या सुरक्षेसाठी उत्तरेकडचं प्रवेशद्वार तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं आहे. मनपानेही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. या घटनेमुळे स्थानकाच्या रोजच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण झाला नसून प्रवाशांची सुरक्षा हे आमचं प्रथम ध्येय्य असल्याने विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.

 पुढे ते म्हणाले की, BMC आणि MMMOCL सुरक्षेच्या उपायांची अंमलबजावणी करून आणि शक्य तितक्या लवकर समस्येचे निराकरण करून प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. तुमची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे! प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. 



हेही वाचा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत 1 जुलैपासून 10% पाणीकपात होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा