Advertisement

मालाड दुर्घटना: मृतांचा आकडा २६ वर

मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर २० फूट भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे.

मालाड दुर्घटना: मृतांचा आकडा २६ वर
SHARES

मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर २० फूट भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे.  

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात मालाडमधील राणी सती मार्गावर महापालिकेच्या जलाशयाची २० फूट उंच आणि २ ते ३ फूट रुंदीची भिंत आजूबाजूच्या झोपड्यांवर कोसळली होती. या दुर्घटनेत १८ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जखमींचा आकडा वाढून ७० आणि मृतांचा आकडा २६ वर गेला आहे. दुर्घटनेनंतर सुरू झालेलं बचावकार्य मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. या दुर्घटनेत सापडलेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. 

या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची तात्काळ मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यानंतर महापालिकेकडून देखील प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 



हेही वाचा-

मालाडमध्ये भिंत कोसळली, मृतांचा आकडा १९ वर

मालाड सब-वे : पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा