Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

Mumbai rains: १३ जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागानं मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

Mumbai rains: १३ जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा
SHARES

भारतीय हवामान विभागानं मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बुधवारी मुसळधार पावसानं मुंबईला चांगलंच झोडपुन काढलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते.

गुरुवारी सकाळी पावसानं विश्रांती घेतली असली तरी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. बुधवारी पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात अक्षरश: दैना उडाली होती रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक मोठा परिणाम झालेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पाऊस थांबलेला दिसतोय पण ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे. हवामान खात्यानं गुरुवारी सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबईत गुरुवारी १२ वाजून १७ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून ४.२६ उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती समोर येत आहे.हेही वाचा - 

'स्पुटनिक व्ही'च्या लसीकरणाला मुंबईत सुरुवात

मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा