Advertisement

सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 'या' स्थानावर


सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई 'या' स्थानावर
SHARES

जगातील सर्वात सुरक्षित शहर यादी नुकताच जाहीर झाली आहे. या यादीमध्ये टोकियो शहर पहिल्या क्रमांकावर आहे. तसंच, भारतातील केवळ मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांचा समावेश असून, मुंबई ४५ आणि दिल्ली ५२ व्या स्थानावर आहे. त्याशिवाय व्यक्तीगत सुरक्षेच्या यादीत मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे ३७ आणि ४१ स्थानावर आहे.

एकूण ६० देश

जगातील ६० देशांमधील सुरक्षित शहरांच्या यादीत आशिया-पॅसिफिक खंडातील एकूण ६ देश आहेत. या भारताचा समावेश असून, भारतातील मुंबई आणि दिल्लीचा समावेश आहे. सिंगापूरमध्ये खासदार, व्यवसायिक, नेते आणि उद्योग अनुभवींमध्ये यासंदर्भात चर्चा झाली होती.

शहर आणखी सुरक्षित

या चर्चेदरम्यान वाटर ली यांनी आपलं शहर आणखी सुरक्षित बनवू शकतो', असं म्हटलं. 'शहरं अधिक सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करीत आहोत. प्रत्येकाची डिजिटल ओळख सुरक्षित करून शहरं देखील अधिक सुरक्षित केली जाऊ शकतात. संपूर्ण जगात आपल्याला सुरक्षा मजबूत करणं गरजेचं आहे. त्यामुळं समाजला सुरक्षित आणि स्थिर ठेवता येऊ शकतं. ’ असही त्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर? कारण काय?

२६ सप्टेंबरपासून आठवडाभर बँका बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा