उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर? कारण काय?

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत उर्मिलाचं फोनवर संभाषण झाल्यापासून या चर्चेने जोर धरला आहे. नार्वेकर यांनी देखील उर्मिलासोबत आपलं बोलणं झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

SHARE

काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अवघ्या ६ महिन्यांत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. उर्मिलाने राजीनामा देऊन आठवडाभरही होत नाही, तोच उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. 

याबाबत उर्मिलानं खुलासा केला असून, 'मी कोणत्या पक्षात जाणार नाही आहे. माझी मीडियाला विनंती आहे की तुम्ही काही ऐकता ते शेअर करू नका', असं म्हटलं आहे.

मैत्रीपूर्ण चर्चा

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत उर्मिलाचं फोनवर संभाषण झाल्यापासून या चर्चेने जोर धरला आहे. नार्वेकर यांनी देखील उर्मिलासोबत आपलं बोलणं झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु ही चर्चा राजकीय नव्हती. एक कलाकार म्हणून उर्मिलाचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. त्यातूनच ही मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याचा खुलासा नार्वेकर यांनी केला. सोबतच याला कुणीही राजकीय रंग देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. 

पक्षांतर्गत राजकारण 

लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या प्रचारात उर्मिला यांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार टीका केली होती. या निवडणुकीत शेट्टी यांनी उर्मिलाचा पराभव केला होता.

या पराभवानंतरदेखील उर्मिला काँग्रेसमध्ये सक्रीय होत्या. अखेर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.  हेही वाचा-

उर्मिला राजीनामा मागे घेणार? वरिष्ठांकडून संयम बाळगण्याचा सल्ला

उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठीसंबंधित विषय
ताज्या बातम्या