Advertisement

मुंबईचा दर्जा घसरला, स्वच्छ शहरांच्या यादीत २९व्या स्थानी


मुंबईचा दर्जा घसरला, स्वच्छ शहरांच्या यादीत २९व्या स्थानी
SHARES

देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईने आठवे स्थान मिळवले आहे, तर मागच्या वर्षी दहावे स्थान मिळवणाऱ्या मुंबईने मात्र यावेळी 29 वे स्थान मिळवले आहे. अनेक प्रयत्न करूनही मुंबईला टॉप 20 शहरात स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे स्वच्छतेत मुंबईची मोठी घसरण झाली आहे. देशातील 434 शहरं आणि नगरात झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणानंतर केंद्र सरकारने ही यादी गुरुवारी जाहीर केली.
महाराष्ट्रात स्वच्छतेत मुंबईपेक्षा नवी मुंबई आणि पुणे अग्रस्थानी आहेत.

कसा होतो हा सर्वे?
केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालय आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत हे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात विविध शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून स्वच्छतेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. केंद्र सरकारचे हे सर्वेक्षण https://gramener.com/swachhbharat/#?city=Rajkot या संकेतस्थळावर होते. ज्यानंतर नागरिक आपले उत्तर यावर नोंदवतात. त्या आधारावर शहराच्या स्वच्छतेची क्रमवारी ठरवली जाते. प्रत्येक शहराला 500 मार्क असतात. ज्या शहराला 500 पेक्षा जितके जास्त मार्क मिळतील ते शहर तितक्याच अव्वल स्थानावर असते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा