Advertisement

डोंगरीत एसआरपीएफच्या जवानाची आत्महत्या

मंत्रालयाजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

डोंगरीत एसआरपीएफच्या जवानाची आत्महत्या
SHARES

मंत्रालयाजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पुष्कर शिंदे (३६) असे या जवानाचे नाव असून, एसआरपीएफच्या या तुकडीची राहण्याची व्यवस्था डोंगरी येथील एका शाळेत करण्यात आली होती.

मंगळवारी ही खळबळजनक घटना घडली असून, सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास पुष्कर यानं स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर डोंगरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

परिमंडळ १ कार्यक्षेत्रात मंत्रालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर स्ट्रायकिंग क्रमांक ३ ( एसआरपीएफ ग्रुप क्रमांक २, पुणे, डी कंपनी, प्लाटून क्रमांक १) तैनात करण्यात आली होती. मंत्रालय इथं रात्रपाळीनंतर जवान डोंगरी येथील महापालिकेच्या शाळेत आले होते.

यावेळी पुष्कर सुधाकर शिंदे (वय ३६) यांनी ९.५० च्या सुमारास एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह जे.जे. रुग्णालयात नेला आहे. एसआरपीएफ तुकडी ६ जानेवारीपासून मंत्रालय परिसरात बंदोबस्तासाठी तैनात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा