मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात वर्षअखेरीस थंडीचं आगमन झाल्यानं मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली. परंतु, काही दिवसातचं म्हणजे अवघ्या ५ दिवसांत पुन्हा तापमानात वाढ झाली. त्यामुळं पुन्हा उकाडा व थंडी वातावरण मुंबईकरांना सहन करावं लागलं. परंतु, पुढील २ दिवसांत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मुंबईत कमाल तापमान ३०.४ अंश, तर किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस होतं. त्याचप्रमाणं राज्याभरात बुधवारी कमाल आणि किमान तापमानात सर्वत्रच वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस, मराठवाडा आणि विदर्भात १४ ते १९ अंश सेल्सिअस होतं. तसंच, राज्यात सर्वत्र कमाल तापमान २७ ते ३३ अंश नोंदविण्यात आलं.
वाऱ्याची उत्तर-पश्चिम दिशा बदलून दक्षिण-पूर्व झाल्यानं रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामु़ळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रातदेखील तापमानात वाढ झाली होती. विदर्भात गोंदिया इथं बुधवारी संध्याकाळपर्यंत ४० मिमी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा -
मानखुर्दमध्ये पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरूवात
तुम्ही हिंसेला पाठिंबा देणार का? - सोनाक्षी सिन्हा