Advertisement

मानखुर्दमध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ मध्ये पोटनिवडणूक होत आहे.

मानखुर्दमध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरूवात
SHARES

मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान केलं जात असून, १० जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

प्रमुख लढत

या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे अल्ताफ काझी, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. शिवसेनेचे लोकरे व भाजपचे पांचाळ यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

जागेसाठी प्रयत्न

शिवसेना व भाजप या दोन्ही पक्ष ही जागा आपल्याकडं खेचण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. प्रभागात मुस्लिम मतदारांचं प्रमाण जास्त असल्यानं समाजवादी पक्षाच्या उमेदवारालाही संधी असणार आहे. तसंच, काँग्रेस ही जागा पुन्हा आपल्याकडं खेचून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतं आहे.

एकूण मतदार

  • पुरुष मतदार : १८ हजार ५४
  • महिला मतदार : १४ हजार ३२
  • एकूण : ३२ हजार ९६
  • निवडणुकीसाठी २८ केंद्र
  • केंद्र क्र. १०मध्ये सर्वांत कमी; ५१६ मतदार
  • केंद्र क्र. १८मध्ये सर्वांत जास्त; १३९८ मतदार



हेही वाचा -

अमेरिका-इराण वाद भारताला पडणार महागात, सर्व सामान्यांवर होणार 'हे' ५ परिणाम

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा वांद्रेमध्ये निषेध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा