Advertisement

जुहू समुद्रकिनारी 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यी बुडाले, शोध मोहीम सुरू

जुहू बीचवर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पाण्यात खेळताना तीन मुले बेपत्ता झाली.

जुहू समुद्रकिनारी 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यी बुडाले, शोध मोहीम सुरू
SHARES

मुंबईतील जुहू बीचवर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पाण्यात खेळताना तीन मुले बेपत्ता (Boys Drown) झाली. त्यामुळे या तिघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे. तर बाकी विद्यार्थ्यांचा अद्याप शोध सुरू आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी त्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी बुडल्याची माहिती दिली.

"चेंबूर इथले चार मित्र जुहू समुद्रकिनारी खेळण्यासाठी आले होते. पोहणे माहीत नसतानाही तिघे समुद्रात गेले. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ते आत खेचले गेले. घटनेच्या वेळी समुद्राची भरतीओहोटी होती पण लाटांनी त्यांना आत ओढले,” अशी माहिती सांताक्रूझ पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिली.

चौघे मित्र जुहू बीचवर गेले होते. त्यापैकी तिघं मुलं पाण्यात उतरली. तर चौथा मित्र बीचवरच होता. त्यानं तिघांना बुढताना पाहिलं. तो त्यांना खेळताना पाहत होता आणि त्यांना परत येण्यास वारंवार सांगत होता पण लाटांनी त्यांना आत ओढले. बचावकार्य सुरू असल्याचे जुहू पोलिसांनी सांगितले.

अमन सिंह, वय 21 वर्षे, कौस्तुभ गणेश गुप्ता, वय 18 वर्षे, तसेच प्रथम गणेश गुप्ता, वय 16 वर्षे अशी या तिघा मुलांची नावं आहेत. हे तिघे बुडाल्याची भीती पालिकेने देखील व्यक्त केली आहे.

"ही घटना मंगळवारी दुपारी 3:30 च्या सुमारास घडली आणि 4:45 च्या सुमारास जीवरक्षकांनी याची माहिती दिली. सांताक्रूझ (प.) येथील जुहू तारा रोड येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या मागे ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाची शोध मोहीम सुरू आहे. नौदलाचे गोताखोर देखील तिघांचा शोध घेत आहेत," असं एका अधिकाऱ्याने सांगितले.हेही वाचा

16 जून रोजी मुंबईत सर्वात मोठी भरती

मोसमी वारे, पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा