Advertisement

राजभवनाच्या अंगणात 'नाच रे मोरा'

मलबार हिल येथील राजभवन परिसराला भेट देण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचं स्वागत मोराने चक्क पिसारा फुलवून केलं अन् घामाने निथळलेल्या अवस्थेतही पर्यटकांच्या मनात पाऊसधारा बरसायला लागल्या.

राजभवनाच्या अंगणात 'नाच रे मोरा'
SHARES

पावसाळी ढग दिसू लागले की, मोर पिसरा फुलवून थुई थुई नाचू लागतो. अशा नाचणाऱ्या मोराचं दर्शन मुंबईकरांना घडणं तसं दुर्मिळच...पण बुधवारी १३ जूनला हा योग जुळून आला. मलबार हिल येथील राजभवन परिसराला भेट देण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचं स्वागत मोराने चक्क पिसारा फुलवून केलं अन् घामाने निथळलेल्या अवस्थेतही पर्यटकांच्या मनात पाऊसधारा बरसायला लागल्या.राजभवनाच्या सौंदर्याची भुरळ

मलबार हिल इथं असलेलं राजभवन म्हणजे राज्यपालांचं निवासस्थान. राजभवन परिसरातील वनसंपदेचं सौंदर्य मुंबईकरच नव्हे, तर परदेशी पर्यटकांना नेहमीच खुणावतं. त्यामुळे मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक आवर्जून राजभवनाला भेट देत इथल्या निसर्गाचा आस्वाद लुटतो.


क्षण टिपला कॅमेऱ्यात

बुधवारी दुपारी बस चालक राजेश हौशनूर पर्यटकांना राजभवनात फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेले असताना अचानक नाचणाऱ्या मोराने त्यांच्यासह पर्यटकांना दर्शन दिलं. राजेश यांनी लागलीच आपल्या कॅमेऱ्यातून हा क्षण टिपून घेतला.पावसाळ्याला सुरूवात होत असल्याने २२ जून ते २ ऑक्टोबर दरम्यान राजभवनाची सफर बंद राहणार आहे. तसंच ऑक्टोबर महिन्याचं बुकिंग १० सप्टेंबरपासून सुरू होईल. त्यामुळे पर्यटकांनी आवर्जून इथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा.
- उमेश काशीकर, जनसंपर्क अधिकारी, राजभवनहेही वाचा-

स्कूल व्हॅनवर बंदी घालणं अशक्यच- उच्च न्यायालयसंबंधित विषय
Advertisement