Advertisement

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर

देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठानं पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळवलं आहे.

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर
SHARES

देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची सन २०२० वर्षाची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय संस्थात्मक नामांकनतर्फे (एनआयआरएफ) गुरुवारी जाहीर करण्यात आली. देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठानं पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळवलं असून, मुंबई विद्यापीठ ६५व्या स्थानावर पोहोचलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील पारंपरिक राज्य विद्यापीठांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गतवर्षी सर्वसाधारण क्रमवारीत १०१-१५० या रँकिंग बँडमध्ये मुंबई विद्यापीठ ८१व्या स्थानावर होतं. राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीसोबतच सर्वसाधारण क्रमवारीतही विद्यापीठानं मोठी मजल मारली असून ४२.४५ गुणांसह ९५व्या स्थानावर झेप घेतली आहे.

या यादीत देशात चेन्नई येथील आयआयटी अव्वल आलं आहे. तर आयआयटी मुंबईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. यंदा राज्यातील १८ हून अधिक संस्था सर्वसाधारण यादीत पहिल्या १००च्या आत आल्या आहेत. यात मुंबईतील होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूटनं ३० वं स्थान पटकावलं आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (आयसीटी) ३४व्या स्थानावर मजल मारली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) ५७वे, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने ९२व्या स्थान गाठलं आहे.

मुंबई विद्यापीठाला प्रत्येकी १०० गुणांपैकी टीचिंग, लर्निंग अँड रिसॉर्सेस (टीएलआर) ४८.०८, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी) २०.८४, ग्रॅज्युएशन आऊटकम (जीओ) ७७.९७, आऊटरीच अँड इन्क्ल्युजिव्हिटी (ओआय) ५३.६१ आणि पर्सेप्शन २३.७९ असे गुण बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळं विद्यापीठाला एकूण ४४ गुण प्राप्त झाले आहेत.



हेही वाचा -

पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली सज्ज

केईएम रुग्णालयात 'इतके' मृतदेह पडूनच



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा