Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर ७.४४ लाख खर्च

मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागाचे उप कुलसचिव राजेंद्र आंबवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत ७ लाख ४४ हजार ४९९ रुपये खर्च करण्यात आला. यात सर्वाधिक खर्च प्रवास आणि जाहिरातीवर करण्यात आला असून प्रवासासाठी एकूण ३ लाख २२ हजार ८९ रुपये, तर जाहिरातीसाठी २ लाख ४३ हजार २३२ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर ७.४४ लाख खर्च
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या २५ मार्च रोजी झालेल्या सिनेट निवडणुकीत ७.४४ लाख रुपयांचा खर्च झाला असून यातील ५.६५ लाख रुपयांचा खर्च हा प्रवास आणि जाहिरातींवर करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यान्वे ही बाब उघड केली आहे.

९ महिन्यांनी उत्तर

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २५ मार्च २०१८ रोजी झालेल्या सिनेट निवडणूक खर्चाची माहिती मागवली होती. २७ मार्च रोजी केलेल्या अर्जात त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत सर्व प्रकारच्या झालेल्या निवडणूक खर्चाची माहिती मागवली होती. त्यानुसार ४ डिसेंबर २०१८ रोजी या अर्जाला विद्यापीठानं उत्तर दिलं.

'असा' झाला खर्च

मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागाचे उप कुलसचिव राजेंद्र आंबवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत ७ लाख ४४ हजार ४९९ रुपये खर्च करण्यात आला. यात सर्वाधिक खर्च प्रवास आणि जाहिरातीवर करण्यात आला असून प्रवासासाठी एकूण ३ लाख २२ हजार ८९ रुपये, तर जाहिरातीसाठी २ लाख ४३ हजार २३२ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.

त्याशिवाय सॉफ्टवेअरसाठी ६८ हजार ८१० रुपये तर टोनर रीफिल्लिंगसाठी १६ हजार ६३८ रुपये, डेकोरेशनसाठी २० हजार ५०० रुपये, ट्रेनिंग वोट काऊटिंगसाठी ३ हजार ३३० रुपये आणि रुग्णालयासाठी ६९ हजार ९०० रुपये हे रुग्णालयावर खर्च करण्यात आले आहेत.

हेही वाचा-

विद्यावेतनासाठी नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा