अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार झाल्यास मुंबई क्रूझ पर्यटनाची राजधानी

मुंबईतील अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार झाल्यानंतर क्रूझ पर्यटनाच्या बाबतीत मुंबई या उद्योगाची राजधानी होईल.

SHARE

क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टनं गेल्या ५ वर्षांपासून पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय, मुंबई बंदरात येणाऱ्या देशी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातचं पुढील वर्षी मुंबईत अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार झाल्यानंतर क्रूझ पर्यटनाच्या बाबतीत 'मुंबई' या क्रूझ पर्यटनाची राजधानी होणार असल्याची माहिती समोर येत आहेदेशी क्रूझ व्यवसायाला चालना देण्यासाठी भाऊचा धक्का इथं डोमेस्टिक टर्मिनल मागील वर्षी उभारण्यात आलं आहे.

क्रूझ पर्यटनात वाढ

मुंबईतील हे डोमेस्टिक टर्मिनल सुरू झाल्यापासून क्रूझ पर्यटनात वाढ झाली आहे. तसंच,   अनेक नव्या क्रूझ ऑपरेटर्सनी क्रूझ सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी 'आंग्रीया' या क्रूझनं मुंबई-गोवा मार्गावर सेवा सुरू केली असून, सध्या एक दिवसाआड अशी ही सेवा सुरू आहे.

मुंबईचा वाटा जास्त

देशातील एकूणच क्रूझ पर्यटनाच्या अकडेवारीत मुंबई अव्वल आहे. त्याशिवाय, देशाच्या क्रूझ व्यवसायात मुंबईचा वाटा निम्म्यापेक्षा जास्त वाढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उभरणीनंतर सन २०२५पर्यंत एक हजार क्रूझ मुंबईत येतील व त्यातून १० लाख पर्यटक प्रवास करणार असल्याचा अंदाज पोर्ट ट्रस्टनं व्यक्त केला आहे. हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावट

मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढलासंबंधित विषय
ताज्या बातम्या

अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल तयार झाल्यास मुंबई क्रूझ पर्यटनाची राजधानी
00:00
00:00