Advertisement

मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगरात विश्रांती घेतली आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला
SHARES

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगरात विश्रांती घेतली आहे. मागील काही दिवस पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर रविवारी मात्र, मुंबईत कडक उन पडलं होतं. त्यामुळं उन्हाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

सरासरीपेक्षा जास्त तापमान

सांताक्रूझ इथं रविवारी ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक असल्यानं सप्टेंबरमध्ये मुंबईकरांनी ३५ ते ३७ अंशांदरम्यानही तापमान अनुभवलेले आहे. कुलाबा इथं ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची रविवारी नोंद झाली आहे.

फारसा पाऊस नाही

मुंबईमध्ये पुढील काही दिवस फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. परंतु, येत्या आठवड्यात मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वारतवण्यात आली आहे.हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावटRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा