Advertisement

मुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचं घर

गिरणी कामगारांप्रमाणे डबेवाल्यांनाही हक्काचं घर मिळणार आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचं घर
SHARES

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbaicha Dabbawala) एक आनंदाची बातमी आहे. डबेवाल्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता गिरणी कामगारांप्रमाणे (Mill worker) डबेवाल्यांनाही हक्काचं घर मिळणार आहे. डबेवाल्यांना शासनाकडून ठाणे (Thana) जिल्ह्यातील ४ ठिकाणांच्या जागांचे प्रस्ताव दिल्यानंतर, नुकताच त्या जागेची पाहणी डबेवाल्यांच्या शिष्ट मंडळानं केली. त्यावेळी त्या जागा डबेवाल्यांना पसंत पडल्या आहेत.

मराठमोळ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या १३० वर्षांपासून जेवणाचे डबे पोहोचविण्याचं काम करणाऱ्या डबेवाल्यांचं मुंबईत स्वत:च्या मालकीचं घर नव्हतं. मागील अनेक वर्षांपासून त्यांची शासनाकडं घरासाठीची मागणी प्रलंबित होती. मागील सरकारकडून त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीचं (MVA) सरकार सत्तेत आल्यानंतर घराचं स्वप्न पूर्ण होण्याची आशा वाढली.

यासाठी नुकतीच डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित (Deputy Chief Minister Ajit Pawar) पवार यांची भेट घेऊन घरांसाठी जमिनीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल, गृहनिर्माण आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत डबेवाल्यांसमवेत भेट घडवून, ताबडतोब पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरांचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले.

यावेळी महसूल खात्याकडून त्यांना ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथ येथील ४ जमिनींचे प्रस्ताव दिल्यानंतर गुरुवारी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असल्याची माहिती डबेवाल्यांनी दिली.



हेही वाचा -

दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधात कारवाई

सीएसएमटी स्थानकात लोकल धडकली बफरला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा