Advertisement

मुंबईकरांना फोनवर मिळणार पावसाचे लाइव्ह अपडेट्स


मुंबईकरांना फोनवर मिळणार पावसाचे लाइव्ह अपडेट्स
SHARES

मुंबईकरांना दर १५ ते ३० मिनिटांना आता पावसाचे लाइव्ह अपडेट्स मिळणार आहेत. मिनिस्ट्री आॅफ अर्थ सायन्सेस (एमओईएस) ने यावर्षी जूनपर्यंत मुंबईत २०० ते २५० पावसाचा अंदाज वर्तवणारी स्वयंचलीत यंत्रे लावण्याची योजना बनवली आहे.


पावसाचा अचूक अंदाज

या यंत्रांच्या आधारे मुंबईत कुठल्या परिसरात किती पाऊस पडेल, याचा अंदाज तर येईलच, पण पाणीच्या पातळीची तपासणी करण्यातही हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना मदत मिळणार आहे.


कुणाची जबाबदारी?

भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्था(आयआयटीएम), पुणे आणि मुंबई महापालिकेसोबत 'एमओईएस' या यंत्रांची देखभाल करणार आहे. या नेटवर्कमुळे मुंबईतील पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यात मदत होईल.

सद्यस्थितीत कुलाबा आणि सांताक्रूझ येथील वेधशाळेच्या माध्यमातून मुंबईतील हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. या वेधशाळेकडे केवळ दोनच उपकरणं असून मुंबई महापालिकेकडेही काही उपकरणे आहेत. ही उपकरणे २००५ च्या जलप्रलयानंतर बसवण्यात आले होते.



हेही वाचा-

पावसाळा पूर्व तयारीसाठी मध्य रेल्वेवर ड्रोनचा वापर !

म्हणे, दिल्लीत मुंबईपेक्षा जास्त पाऊस! भूगोलाच्या पुस्तकातही घोळ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा