Advertisement

म्हणे, दिल्लीत मुंबईपेक्षा जास्त पाऊस! भूगोलाच्या पुस्तकातही घोळ

दिल्लीत मुंबईपेक्षा जास्त पाऊस पडतो, असं पुस्तकातील पान क्रमांक २८ मधील आलेखात म्हटलं आहे. शिवाय भारताच्या तुलनेत ब्राझीलमध्ये पावसात जास्त वाहतूककोंडी होत असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे.

म्हणे, दिल्लीत मुंबईपेक्षा जास्त पाऊस! भूगोलाच्या पुस्तकातही घोळ
SHARES

यंदा दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करत पुस्तके अधिक वास्तवादी माहितीवर आधारीत, आकर्षक, विद्यार्थीस्नेही करण्यात आली आहेत. परंतु या पुस्तकांमध्ये अनेक त्रुटी समोर येत असल्याने शिक्षण मंडळाला टिकेला सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यशात्र्याच्या पुस्तकात सत्ताधारी पक्षांचं गुणगान करत विरोधी पक्षांवर राजकारणाचा डाव साधल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातही नकाशे, पर्जन्यमानाचा अंदाज तसंच हवामानासंदर्भात काही चुका असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.



पिकांची माहितीच नाही

या वर्षी दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारत आणि ब्राझीलची तुलना करण्यात आली आहे. ही तुलना करताना ब्राझीललाच जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. भारतात कुठली पिके घेतली जातात, देशात कोणते उद्योगधंदे आहेत? याची माहिती या पुस्तकात नमूद करण्यात आलेली नाही.



मुंबईपेक्षा दिल्लीत जास्त पाऊस

भूगोलाच्या पुस्तकातील पान क्रमांक २४ वर दिलेला भारताचा नकाशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला असला, तरी तो थोडा तिरका झाला आहे. यामुळे हा नकाशा नजरेला वेगळाच दिसत असून हा नकाशा प्रमाणबद्ध नसल्याची टिपही नकाशाखाली देण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तकात चुकीच्या नकाशाच्या आधारे विद्यार्थ्यांना चुकीचा भूगोल शिकवला जात असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे.

एवढं कमी की काय दिल्लीत मुंबईपेक्षा जास्त पाऊस पडतो, असं पुस्तकातील पान क्रमांक २८ मधील आलेखात म्हटलं आहे. शिवाय भारताच्या तुलनेत ब्राझीलमध्ये पावसात जास्त वाहतूककोंडी होत असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे.


'इथं'ही सदाहरित वने

देशाच्या सदाहरित भागातही शिक्षण मंडळाने गोंधळ घातल्याचं दिसत आहे. भारतातील सदाहरित भाग हा पश्चिम घाट, केरळ, पश्चिम बंगाल या भागांपुरताच नसून आसाम, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यांतही सदाहरित वने असल्याचं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.



ब्राझीलच्या भूगोलातही गोंधळ

भारताच्या भूगोलातच नव्हे, तर ब्राझीलच्या भूगोलातही असंख्य चुका आहेत. ब्राझीलचे काही नकाशे चुकीचे असून ते ऑक्सफर्डच्या प्रमाणिक नकाशापेक्षा वेगळे आहेत. अॅमेझॉनच्या खोऱ्यात होणाऱ्या पावसाची नोंदही पाठ्यपुस्तकात चुकीची देण्यात आली आहे.


भूगोलाच्या पुस्तकासंदर्भात जर कोणाच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी या त्रुटी विषय समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांच्या तक्रारीवर चर्चा करून योग्य तो बदल करण्यात येईल
- डॉ. एन. जे. पवार, अध्यक्ष, भूगोल विषय समिती



हेही वाचा-

स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहानी आता १० वीच्या पुस्तकात

नववी नापासांसाठी खुशखबर! फेरपरीक्षेची मिळणार संधी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा