बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) 'डोमेस्टीक आणि स्पेशल केअर कचरा संकलन' उपक्रमांतर्गत 1 मे पासून मुंबईकरांना सॅनिटरी कचरा (sanitary waste) विशेष पिवळ्या पिशव्यांमध्ये वेगळे करता येईल.
या उपक्रमात सॅनिटरी पॅड, डायपर, कालबाह्य औषधे आणि इतर संभाव्य धोकादायक पदार्थांसारख्या घरातील कचरा गोळा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, महिला वसतिगृहे, ब्युटी पार्लर आणि शैक्षणिक संस्थांना विशेष पिवळ्या पिशव्या (yellow bags) दिल्या जातील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
"मुंबईतून (mumbai) दररोज 7,000 -8,000 टन घनकचरा गोळा केला जातो. त्यापैकी 70 ते 80 टन डोमेस्टीक आणि स्पेशल केअर कचरा असतो. ज्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर, टॅम्पन्स, कॉटन स्वॅब आणि बँडेज सारख्या वापरलेल्या स्वच्छता उत्पादनांचा समावेश असतो," असे किरण दिघावकर म्हणाले.
महापालिकेच्या (bmc) या उपक्रमाचे उद्दिष्ट स्वच्छताविषयक कचऱ्याची सुरक्षित हाताळणी आणि प्रक्रिया करणे आहे. ज्यामुळे आरोग्याला अनेक धोके निर्माण होऊ शकतात. महापालिका याबाबत जागरूकता मोहिम राबवेल आणि सहभागी आस्थापनांना योग्य कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करेल.
हेही वाचा