Advertisement

मुंबईत मुस्लिम महिलांनी केला तिहेरी तलाकचा विरोध

'आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड' (एआयएमपीएलबी) च्या नेतृत्वाखाली महिला सदस्यांनी तिहेरी तलाक विधेयकातील त्रुटी दर्शवणारे बॅनर हाती घेऊन हे मूक आंदोलन केलं. या आंदोलनात शहरातील विविध भागांतील शेकडो मुस्लिम महिला एकवटल्या होत्या.

मुंबईत मुस्लिम महिलांनी केला तिहेरी तलाकचा विरोध
SHARES

मुस्लिम महिलांनी शनिवारी तिहेरी तकाल विधेयकाच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन केलं. केंद्र सरकार जो कायदा बनवू पहात आहे, तो मुस्लिम शरिया कायद्याच्यावरूद्ध असल्याचं असल्याचं मत या महिलांनी नोंदवलं.

कायद्यातील त्रुटी

'आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड' (एआयएमपीएलबी) च्या नेतृत्वाखाली महिला सदस्यांनी तिहेरी तलाक विधेयकातील त्रुटी दर्शवणारे बॅनर हाती घेऊन हे मूक आंदोलन केलं. या आंदोलनात शहरातील विविध भागांतील शेकडो मुस्लिम महिला एकवटल्या होत्या.

हस्तक्षेपाचा प्रयत्न

हा कायदा खूप घाईघाईने बनवण्यात आला आहे. याद्वारे सरकार मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. अस मत या कायद्याविरोधात मैदानात उतरलेल्या महिलांनी व्यक्त केलं.

अाम्ही जायचं कुठे?

तिहेरी तलाक बंदी कायद्यानुसार जर आमच्या पतीला तुरूंगवास झाला, तर आम्ही मुलाबाळांना घेऊन जायचं कुठे? पतीच जर तुरूंगात असेल, तर मुलांचं पालनपोषण कोण करणार, त्यांची जबाबदारी कोण उचलणार हा प्रश्न सरकार सोडवणार का? असे प्रश्न महिलांनी उपस्थित केले.हेही वाचा-

म्हणून, मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण नाही- तावडेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा