Advertisement

'नॅच्युरल्स’ आईसक्रीमला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, गुजरातमधील कंपनीला नाव न वापरण्याचे निर्देश

याच नावाच्या गुजरातमधील कंपनीला पुढील आदेश मिळेपर्यंत 'नॅच्युरल्स' हे नाव वापरण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे.

'नॅच्युरल्स’ आईसक्रीमला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, गुजरातमधील कंपनीला नाव न वापरण्याचे निर्देश
SHARES

लोकप्रिय आईसक्रीम ब्रॅण्ड 'नॅच्युरल्स' आईसक्रीमला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याच नावाच्या गुजरातमधील कंपनीला पुढील आदेश मिळेपर्यंत 'नॅच्युरल्स' हे नाव वापरण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे.

नॅच्युरल्स आईसक्रीमचे सर्वेसर्वा रघुनंदन कामत यांनी वडोदरा, गुजरात इथल्या मंजलपूरमधल्या नॅच्युरल्स आईसक्रीम नावाच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडोदऱ्याचे सन्मान पटेल यांनी आपण साल १९९२ पासून 'नॅच्युरल्स आईसक्रीम' या नावाचा ट्रेडमार्क वापरत असल्याचा दावा कोर्टात केला.

मात्र, रघुनंदन कामत यांनी त्यापूर्वीच म्हणजे १९८४ पासून नॅच्युरल्स या नावाचा ट्रेडमार्क नोंदवला होता. त्यासंदर्भातील सर्व कगदोपत्री पुरावे कामत यांनी न्यायालयात सादर केले. त्यामुळे प्रथमदर्शनी सन्मान पटेल यांना नॅच्युरल्स हा ट्रेडमार्क वापरण्याची मनाई करण्याचा कामत यांचा दावा योग्य आहे, असं नमूद करत हायकोर्टानं कामत यांना अंतरिम दिलासा दिला.

तसंच पटेल यांना पुढील आदेश येईपर्यंत 'नॅच्युरल्स' हे नाव व्यापारासाठी आणि कोणतंही उत्पादन विक्रीसाठी वापरण्यास मनाई करत सुनावणी ९ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

कंपनीनं ‘नॅच्युरल्स’ या नावाचा वापर करून ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. त्यासाठी १५० कोटींची नुकसान भरपाईही कामत यांनी या याचिकेद्वारे मागितली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.

आज नॅच्युरल्स आईसक्रीम जवळपास वर्षाला ४८ लाख किलो आईसक्रीमची विक्री करत असून त्यांच्या देशभरात १३० फ्रेंन्चाईजी आहेत. त्यांची साल २०१९-२० ची वार्षिक उलाढाल ३१२.७ कोटी एवढी आहे.

वडोदरास्थित या आईसक्रीम कंपनीनं कामत यांच्या नॅच्युरल्स आईसक्रीम या ट्रेडमार्क नावाचा वापर करून व्यापार जगत आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण केला, अशी माहिती कामत यांच्या वतीनं दिली गेली. प्रतिवादी वडोदरास्थित कंपनीचे मालक सन्मान पटेल यांच्यावतीनं मात्र कामत यांच्या या दाव्याला विरोध करण्यात आला.



हेही वाचा

कुपोषण कमी करण्यासाठी IITनं तयार केलं पोषणमूल्य वाढवणारं खाद्य

मास्टर शेफ संजीव कपूर यांची पूरग्रस्तांना दररोज पुरवताहेत १५ हजार थाळ्यांची मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा