Advertisement

नवी मुंबई : सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार

पावसाळ्यासाठी सुरू करण्यात आलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष सिडकोच्या कार्यक्षेत्रातील समस्यांचे निराकरण करेल.

नवी मुंबई : सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार
SHARES

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) 24X7 आपत्कालीन ऑपरेशन केंद्र 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष सिडकोच्या कार्यक्षेत्रातील समस्यांचे निराकरण करेल.

सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथील तळमजल्यावर हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून शनिवार, रविवार, सार्वजनिक सुटी यासह सर्व दिवस तो कार्यरत राहणार आहे. हे आपत्कालीन परिस्थितीत अभियांत्रिकी, आरोग्य, अग्निशमन दल, सुरक्षा आणि उद्यान यासह विविध विभागांमधील संवाद आणि समन्वय सुलभ करेल.

वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी झाडे किंवा फांद्या, रस्त्यावरील उघड्या नाल्या सुरक्षित करणे, पूर, खड्डे, कचरा साचणे, पाणी साचणे, आगीच्या घटना, साथीचे रोग, सर्पदंश, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, आणि बरेच काही यांसारख्या समस्यांवर केंद्र त्वरीत कारवाई करेल.

सिडकोने खारघर, पनवेल (पूर्व), पनवेल (पश्चिम), कळंबोली, नावडे, काळुंद्रे, तळोजा आणि कामोठे हे नोड पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. या नोड्समधील नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेला आपत्तीविषयक समस्यांबाबत माहिती द्यावी किंवा तक्रारी कराव्यात.

नागरिकांकडून माहिती किंवा तक्रारी मिळाल्यानंतर, आपत्कालीन ऑपरेशन केंद्रातील अधिकारी त्वरीत निर्णय घेतील आणि संबंधित नोड्समधील वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती देतील, आवश्यक सूचना देतील.

त्वरीत मदत पुरवण्यासाठी केंद्र अग्निशमन दल, रुग्णालये, वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्यांशी समन्वय साधेल. प्रशासकीय सुरक्षा गट आणि सामाजिक सेवा संस्थांचे स्वयंसेवक मदत करतील. 

हेल्पलाइन क्रमांक

आपत्ती उद्भवल्यास, नागरिक व्हॉट्सअ‍ॅप किंवा मेल किंवा लँडलाइन नंबरद्वारे नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधू शकतात:

1. संपर्क क्र. - 022-6791 8383/8384/8385, 27562999

2. टोल फ्री क्र. - 1800226791

3. व्हॉट्सअॅप क्र. - 8879450450

4. फॅक्स क्र. - 022-679181995

5. ईमेल- eoc@cidcoindia.com



हेही वाचा

मुंबईत 14 स्मार्ट मॅनहोल बसवण्यात येणार, 'असे' आहेत फायदे

ठाणेकरांनो पाणी उकळून प्या! पाण्याला दुर्गंधी येत असल्याची रहिवाशांची तक्रार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा