Advertisement

ठाणेकरांनो पाणी उकळून प्या! पाण्याला दुर्गंधी येत असल्याची रहिवाशांची तक्रार

ठाणे शहराला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याला विशिष्ट वास येत असल्याची तक्रार केली जात आहे.

ठाणेकरांनो पाणी उकळून प्या! पाण्याला दुर्गंधी येत असल्याची रहिवाशांची तक्रार
SHARES

पावसाळ्यात (Monsoon) पिण्याच्या पाण्यामुळे (Drinking water) आजार झपाट्याने पसरतात. यामुळे स्वच्छ व उकळलेले पाणी पिण्याचे आवाहन केले जाते. ठाण्यातल्या काही भागांमध्ये देखील अशीच काहीशी समस्या निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेकडून (Mumbai Water cut) ठाणे शहराला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याला विशिष्ट वास येत असल्याची तक्रार केली जात आहे. ठाण्यातील कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

ठाणे (Thane water news) जिल्ह्यातही गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाऊस पडत आहे.

पाणी टंचाईची समस्या सुटण्याची शक्यता असली तरी ठाणे करांना आता नवीन चिंता सतावत आहे. पिण्याच्या पाण्यामुळे जलजन्य आजार झपाट्याने पसरतात. त्यामुळे पाणी पिताना खबरदारी घेण्याचा सल्ला ठाणे महापालिकेने दिला आहे. पावसाळ्यात गढूळ आणि दूषित पाणी येण्याची शक्यता असते.

यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या जलविभागाशी संपर्क साधला असता, ठाणे शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून वितरित होणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत होती. त्यामुळे कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट परिसरातून यासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. हा वास कुठून आणि कसा आला याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत मुलुंडपासून घाटकोपरपर्यंत पाण्याच्या दुर्गंधीच्या तक्रारी नाहीत. ठाणे शहरात मुंबई महापालिकेकडून वितरीत करण्यात येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असल्यास पाणी वितरणाची शुद्धता तपासली जाईल, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिले.



हेही वाचा

मागाठाणे मेट्रो स्टेशन धोक्यात, बिल्डरसोबत पालिका-MMRDAवर कारवाईची प्रकाश सुर्वेंची मागणी

मुंबईच्या तुंबईवर भन्नाट जुगाड, AI आर्टिस्टची आयडियाची कल्पना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा