Advertisement

Ganesh festival 2020: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विरोध नाही

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांतून कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो चाकरमानी गावी जातात. या जाचक अटींमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

Ganesh festival 2020: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विरोध नाही
SHARES

केवळ मुंबईच नाही, तर देशातील कानाकोपऱ्यात राहणारे चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. कोरोनाचं संकट असलं, तरी यावर्षी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असा खुलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी (no barriers for devotees to come in konkan for ganesh festival 2020 says sindhudurg guardian minister uday samant) केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत शांतता समितीची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. 

'गणपतीला गावी यायचे असेल तर ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहचावं लागेल. त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ई-पास नसेल तर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. गावात येणाऱ्या चाकरमान्यांना सक्तीने १४ दिवस गावाबाहेर क्वारंटाईन राहावं लागणार आहे', असं जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती मिळताच मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवाय या जाचक अटींवर टीका होऊ लागल्यावर मंजुलक्ष्मी यांनी हा अंतिम निर्णय नसून यासंदर्भात आणखी एक बैठक होणार असल्याचा खुलासा केला. 

हेही वाचा - Ganesh Chaturthi 2020: यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांतून कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो चाकरमानी गावी जातात. या जाचक अटींमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. 

त्यासंदर्भात उदय सामंत म्हणाले की, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (क्वरंटाईन ) १४ दिवस ठेवण्यापेक्षा ७ दिवस ठेवणं, त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देणं, त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचं नियोजन, तसंच त्यांची कोविड-१९ ची तपासणी करणं आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली.

कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलंच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही सामंत यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा - Reduce Height Of Ganesh Idols: यंदा गणेशमूर्ती लहानच ठेवा, मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा