Advertisement

३१ मार्चपर्यंत माथेरानमध्ये पर्यटकांना 'नो एन्ट्री'

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांना बंदी

३१ मार्चपर्यंत माथेरानमध्ये पर्यटकांना 'नो एन्ट्री'
SHARES

जगभरामध्ये थैमान घालणार्‍या कोरोना विषाणुचे रुग्ण भारतातील अनेक राज्यांमध्ये सापडले आहेत. भारतामधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४०च्या वर पोहचला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता माथेरानमध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा आणि माथेरानचे मुख्याधिकार्‍यांनी पत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

हेही वाचाः- जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई- छगन भुजबळ

रायगड जिल्हय़ामधील माथेरान हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथे मोठय़ा प्रमाणात नागरिक पर्यटनासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होऊन करोना विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच माथेरानमध्ये होणारी पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी हा पर्यटकांना माथेरानमध्ये येण्यास बंदी घालण्याचा आदेश देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या आदेशानुसार माथेनरामध्ये ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना जाता येणार नाही. या ठिकाणी कोणत्याही पर्यटकांनी येऊ नये असं प्रशासाने म्हटले आहे. माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बापूराव भोई आणि नगाराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पर्यटकांवर बंदी घालण्यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

हेही वाचाः-Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...

राज्यातील सर्व शाळांना तसेच शैक्षणिक संस्थाना ३१ मार्चपयर्ंत सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण मुंबई-पुण्यामधून आपल्या गावाकडे जातानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्‍वभूमीवर काहीजण पर्यटनस्थळांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच माथेरानमध्ये हे आदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा